प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन येथे गुणवंत विद्यार्थ्यांन चा सत्कार


*आदिवासी भागात शिक्षणातील हिरे शोधणे कठीण काम*


🟣 नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री भाकरे यांचे प्रतिपादन
🟣 प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे गुणवंतांचा सत्कार


रामटेक (मनसर) - आदिवासी समाजात अनेक गुण आहे. या गुणाला शिक्षणाची सोबत देऊन शिक्षणाचे गुणवंत तयार करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागतो. आदिवासी भागात शिक्षणातील हिरे शोधणे कठीण काम असले तरी प्रकाश हायस्कूलने हे काम अतिशय निष्ठेने केले याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री विजय भाकरे यांनी केले.
कांद्री मनसर येथील प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आज (ता ६) माॅयल कान्द्री-माईन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माॅयलचे खानप्रबंधक श्री मनोज मोढे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून रामटेक पंचायत समितीचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री विजय भाकरे , ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शालिनी रामटेके, प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन चे प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे, माॅयल कान्द्री-माईनचे कर्मिक अधिकारी श्री ललीत अरसडे, माॅयलचे इलेक्ट्रीकल इंजिनिअर श्री लोहकरे, साधन व्यक्ती सौ. मानकर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी माॅयल तर्फे विद्यार्थ्यांना सोलर एनर्जीवर मार्गदर्शन करुन रोजगारभिमुख उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नुकताच झालेल्या १२ वी व १० वी तील विद्यार्थी सौरभ ठाकरे , कु. योगिता रौतेल, दिव्यांग विद्यार्थी साक्षी दोदंलकर, कु. गायञी कठौते, नयन चौधरी, प्रियंका लोणी यांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी भाकरे यांनी विद्यार्थ्यांनी शिकावे, सुप्त गुणाना वाव द्यावा असे सांगीतले. तसेच माॅयल प्रबंधक मोढे यांनी माॅयल कामगार चा मुलांनी शिक्षण घेतल्याने सर्वागीण विकास होतो असे सांगीतले इंजिनिअर लोहकरे यानी सोलर एनर्जी जागृरकता करताना विद्युत बचत, थरमल पावर व ग्लोबल वॉर्मिग विषयी जागृरकता केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री अशोक नाटकर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री श्याम गासमवार, श्री विजय लांडे, श्री ठकराले बाबु, श्री प्रभाकर खंडाते, पालक प्रतिनिधी सौ लोधी, सौ.मरस्कोल्हे, धर्मराज दोदंलकर यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा