*पदोन्नती देण्यासाठी तातडीने सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी*

*विदर्भ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघाची मागणी*


नागपूर - पदोन्नतीतील लाभ देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी तातडीने सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करण्यासंदर्भात तातडीने सूचना निर्गमित करावी, अशी मागणी आज (ता २७) विदर्भ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांच्याकडे करण्यात आली.
विदर्भ प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री रविंद्र काटोलकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत चर्चा करण्यात आली. यात अनेक शैक्षणिक संस्था अद्यावत सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करीत नाही त्यामुळे अनेक पात्र शिक्षकांना पद्दोन्नतीचा लाभ मिळत नाही. मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या हक्कावर गदा येत. त्यामुळे शिक्षण विभागाने तत्काळ पत्र निर्गमित करुन सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करायला लावावे, तसेच सेवाज्येष्ठता यादी नसल्यास अशा प्रकरणात लक्ष केंद्रित करून पात्र शिक्षकांना लाभ मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात यापूर्वी पत्र निर्गमित केले असून पुनश्च सर्व मुख्याध्यापकांना स्मरण करून देणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी श्री रविंद्र काटोलकर यांनी दिले. यावेळी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, माध्यमिक जिल्हा संघटक श्री शेषराव खार्डे, काॅग्रेस शिक्षक सेल मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश भोयर, जिल्हा ग्रामीण संघटक श्री गणेश खोब्रागडे, माध्यमिक संघटक श्री नरेंद्र धात्रक, श्री वासू उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा