*11 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
*जागतिक लोकसंख्या दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2021 - रिचर्ड बॅन्सन - हे त्याचा व्हर्जिन गॅलेक्टिक अंतराळा व्दारेअंतराळयान जाणारे पहिले सामान्य नागरिक झाले*
👉 *1979 - स्काॅयलॅब - हे अमेरिकेचे पहिले अंतराळ स्थानक हिन्दी महासागरातील पृथ्वीचा वातावरणात प्रवेश असताना अपघातात नष्ट*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1927 - थिओडर हॅराल्ड मॅमन-लेसरचे निर्माते यांचा जन्म*
👉 *1967 - झुम्पा लाहिरी- भारतीय- अमेरिकन कांदबरीकार आणि लघु कथालेखक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2009 - शांताराम नांदगावकर - गीतकार यांचे निधन*
👉 *2003 - सुहास शिरोडकर - कांदबरीकार आणि रहस्य कथालेखक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:मरावे परी किर्ती रूपे उरावे.* ▬▬▬#########▬▬▬
_*आजची बोधकथा*_
▬▬▬#########▬▬▬
*मनाची एकाग्रता*
*एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा तो वृद्ध म्हणाला ,"मुलांनो कोणत्याही युद्धात शारिरीक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्त्वाची असते . कोणत्याही परिस्थितीत मन खनखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे .*
*तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात .मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास यश हमखास मिळते.*
▬▬▬#########▬▬▬
© *प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ १) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले? २)आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिकणारी पहिली भारतीय महिला मुष्ठीयोद्धा कोण ? ३) सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
(उत्तरे: १-मुंबई,
२-एम.सी.मेरिकोम,
३-गोपाळ गणेश आगरकर. )
▬▬▬#########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#########▬▬▬
■ *राज्याचा शालेय शिक्षण दर्जा घसरला? केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2.0' जारी*
■ *जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर नेमणूक करणेबाबत पत्र निर्गमित*
● *देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्थेनेचे (old pension scheme जुनी पेन्शन योजना लागु करण्यास स्थगितीचे आदेश*
■ *न्यायालयीन आदेशानुसार लेखाधिकारी करणार शिक्षक शिक्षकेतररांच्या सेवापुस्तकांची पडताळणी*
■ *मुंबई महानगरपालिकेत 10 वी पासवर सफाई कर्मचारी आणि परिचारिका भरती, पगार 30000 रुपये*
■ *यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर; 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर*
■ *पक्षाचं नाव अन् चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, 31 जुलैला सुनावणी* ▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा