*12 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - एम. एस. स्वामीनाथन याना टिळक पुरस्कार प्रदान*
👉 *1982 - राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅकेची (NABARD) स्थापना झाली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1928 - सुब्बु अर्जुन - भारतीय लेखक आणि कथाकार यांचा जन्म*
👉 *1961 - शिव राजकुमार- भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2013 - अमर बोस- बोस कार्पोरेशन चे संस्थापक यांचे निधन*
👉 *2022 - अवधश कौशल-भारतीय सामाजिक कार्यकर्ता आणि शैक्षणिक, पद्मश्री यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▬▬▬########▬▬▬
*सुविचार:खऱ्या विद्यार्थ्यांना कधीच सुट्टी नसते ,सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.* ▬▬▬#######▬▬▬
*आजची बोधकथा*
*सवय*
▬▬▬#######▬▬▬
एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायलाप्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता.
पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
*तात्पर्य : - जास्त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्या संस्कृतीचे चांगले काही घेताना आपल्या संस्कृतीचे विस्मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा._*
▬▬▬#######▬▬▬
© *प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ *१)एशियन खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला कोण? २)महाराष्ट्र संदर्भात मंत्रीपरिषदेतील मुख्यमंत्रीसह राज्यातील मंत्र्यांची संख्या कमीत कमी किती आवश्यक आहे? ३)भारतातील सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू आणि गुटखा यांच्या सेवणावर बंदी करणारे पहिले राज्य कोणते?*
उत्तरे:(१.आरती सहा,२.चोवीस,३.महाराष्ट्र.) ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬▬#######▬▬
■ *जुन्या पेन्शनसाठी देशातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे 10 ऑगस्टला देशव्यापी महा आंदोलन !*
■ *राज्य सरकारचा मोठा निर्णय, सेवानिवृत्त शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमण्यास सुरुवात, वेतन मिळणार २० हजार*
■ *विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती तूर्तास मागे*
● *केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का; ईडी संचालकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे बेकायदेशीर, 31 जुलैपर्यंत पद सोडण्याचे निर्देश*
● *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यास काँग्रेसचा विरोध; थेट नाना पटोलेंना पत्र*
● *भारताच्या लेकींची कमाल.... बांगलादेशचा 87 धावांत खुर्दा, दीप्ती-शेफालीचा भेदक मारा*
▬▬▬##########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा