*14 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *शुक्रवार* 🛟
*गोपाळ कृष्ण आगरकर जन्मदिन*
*शंकरराव चव्हाण जन्मदिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2013 - डाकतार विभागाची 160 वर्षापासून ची तार सेवा बंद झाली*
👉 *2003 - सन्दीप चंदा- जागतिक बुध्दिबळ महासंघ व्दारा याना ग्रॅडमास्टर पुरस्कार प्रदान*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1961 - एर्डन एरुर - जगातील पहिली एकट्याने मानव प्रक्षिक्षणा पूर्ण केली यांचा जन्म*
👉 *1920 - शंकरराव चव्हाण - महाराष्ट्राचे 5 वे मुख्यमंत्री याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2003 - लिला चिटणीस - चित्रपट अभिनेञी यांचे निधन*
👉 *2003 - रज्जु भैया - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4 थे सरसंघचालक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▬▬▬######▬▬▬
*सुविचार:मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे*
▬▬▬######▬▬▬
*बोधकथा* ▬▬▬######▬▬▬
*अनुभवाच्या जोरावर यश*
एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-यानेही तोच निर्णय घेतला. पहिला व्यापारी म्हणाला, भाई आपण दोघेजण एकत्र जाण्याने अडचण निर्माण होईल एक तर तू पहिल्यांदा जा किंवा मला तरी जाऊ दे. दुस-या व्यापा-याने विचार केला, आपण पहिल्यांदा जाण्यात फायदा आहे, रस्त्याने सरळ गेलो तर बैलांना चारापाणी मिळेल. मनाला वाटेल त्या किंमतीवर सामान विकेन. त्याने पहिल्यांदा जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या व्यापा-याला वाटले, या व्यापा-याच्या जाण्याने गाडीवाट चांगली तयार होईल. याचे बैल कडक गवत खातील व माझ्या बैलांना चांगले मऊ गवत खायला मिळेल. नव्या खोदलेल्या विहीरीचे पाणी प्यायला मिळेल. शिवाय चांगल्या किंमतीवर सौदा करता येईल. दुस-या व्यापा-याच्या माणसांनी पाण्याने भरलेल्या घागरी बरोबर घेतल्या आणि प्रवासाला सुरुवात केली. वाटेत काही भिजून आलेले लोक त्यांना भेटले, त्या लोकांनी व्यापा-याला सांगितले, पुढे पाऊस खूप आहे, पाणी घेऊन जाण्याची गरज नाही. व्यापा-याने त्यांचा सल्ला ऐकला. त्या रात्रीच त्या व्यापा-याचा काफिला लुटला गेला. व्यापारीही मारला गेला.एक महिन्याने पहिला व्यापारी पण प्रवासाला निघाला, तेव्हा दरोडेखोराच्या माणसांनी त्यालाही खोटे बोलून भुलविण्याचा प्रयत्न केला पण पहिला व्यापारी त्यांच्या बोलण्याला भुलला नाही. व्यापा-याच्या माणसांनी दरोडेखोरांची माणसे कशी काय ओळखली असे व्यापा-याला विचारले असता व्यापारी म्हणाला, अरे या दिवसात या भागात पाऊस कसा पडेल हा साधा विचार मी डोक्यात आणला व दरोडेखोरांची माणसे मला कळून आली. व्यापारी पुढे गेला व त्याच्या धंद्यात अशा छोट्याशा गोष्टींमुळे तो यशस्वी झाला. *तात्पर्य :अनुभवाने माणूस यशस्वी होतो* ▬▬▬######▬▬▬ _*ठळक घडामोडी*_ ▬▬▬######▬▬▬
■ *इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर*
■ *आमरण उपोषण करून आम्ही मेलो तरी दखल घेणार नाहीत, राजकारण या थराला कधीच गेलं नव्हतं; डॉ. भारत पाटणकरांची खंत*
■ *खातेवाटपाचा तिढा सुटला? अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत; सूत्रांची माहिती*
■ *अश्विनची एक नंबर कामगिरी, पहिल्याच दिवशी सहा विक्रमाला गवसणी*
▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा