*17 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
*आंतरराष्ट्रीय न्यायासाठी दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1996 -चेन्नई मद्रास म्हणून ओळखल्या जाणारा शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले*
👉 *1975 - अमेरिकेचे अपोलो आणि रशियाचे सोयुझ हे दोन अंतराळयान एकमेकास जोडले गेले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1930 - बाबुराव बागूल- दलित साहित्यीक यांचा जन्म*
👉 *1920 - गाॅर्डन गुल्ड- लेसरचे संस्थापक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2020 - सी.एस. शेषाद्री-भारतीय गणिततज्ञ, मॅथेमॅटिक्स इन्सिट्युट चे संस्थापक पद्मभूषण व शांती स्वरूप भटनागर पुरस्कार यांचे निधन*
👉 *2012- मृणाल गोरे- समाजवादी नेत्या यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▬▬▬##########▬▬▬ सुविचार:दुर्जनांला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.*. ▬▬▬##########▬▬▬ *स्वप्न आणि सत्य*
▬▬▬##########▬▬▬
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्या पित्याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते. मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यात सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’
*तात्पर्य:- खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहला हवे.*
▬▬▬#########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ *१)२०११च्या जंगणने नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? २)'घरचा पुरोहित' ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? ३) RTI ACT 2005 नुसार अतिशय तातडीच्या (जीवन किंवा मृत्यूच्या)परिस्थितीत किती कालावधीत माहिती देणें बंधनकारक आहे? उत्तरे: (१.९२५, २.भास्करराव जाधव, ३. ४८ तास ) ▬▬▬#########▬▬▬ ठळक घडामोडी*
▬▬▬#########▬▬▬
■ *उद्यापासून पावसाळी अधिवेशन, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार*
■ *ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालक म्हणून महिलांची होणार नेमणूक, ड्रायव्हर म्हणून महिलांना संधी देणारा ताडोबा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प*
■ *महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट*
■ *स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या सुनावणीसाठी तारीख निश्चित, तब्बल दोन महिन्यांनंतर सुप्रीम कोर्टात 18 जुलैला सुनावणी*
■ *पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा