*18 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1980 - रोहीणी 1 भारतीय उपग्राचे यशस्वी प्रक्षेपण*
👉 *1968 - इंटेल (INTEL) कंपनीची स्थापना*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1950 - रिचर्ड बॅन्सन व्हर्जीन ग्रुप चे संस्थापक यांचा जन्म*
👉 *1971 - सुखविंदर सिंग - भारतीय गायक-गीतकार आणि अभिनेते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2020 - राजीव सॅम गंभीर - भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिग चे प्रणेते यांचे निधन*
👉 *2013 - वाली - भारतीय कवी, गीयकार आणि अभिनेते यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▬▬▬#######▬▬▬
*सुविचार:त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे.नव्हे,त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.*
######################## *आजची बोधकथा*_
*कष्टाची कमाई श्रेष्ठ* ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬
एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.
*तात्पर्य :पापाची कमाई असंतोष आणि दुःखाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्मला सुख देते.*
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १) राष्टीय चित्रफीत कार्यालयाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? २)आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिकणारी पहिली भारतीय महिला मुष्ठीयोद्धा कोण ? ३) गुरू शिखर कोणत्या पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे ?
(उत्तरे: १-पुणे,
२-एम.सी.मेरिकोम,
३-अरवली. ) ▬▬▬######▬▬▬ *ठळक घडामोडी*
■ *ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन*
■ *नवी मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शौचालयात सहावीची विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळली*
■ *शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक; उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्याची मागणी*
• *शाब्बास पोरा... बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र*
◆ *विश्वचषकाआधी टीम इंडियासाठी खुशखबर, 4 महत्वाचे खेळाडू दुखापतीतून सावरले, लवकरच करणार कमबॅक* ▬▬▬#######▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा