21 जुलै दिनविशेष


*21 जुलै दिनविशेष 2023 !*

🛟 *शुक्रवार* 🛟


       🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *2022 - द्रौपदी मुर्म - याची भारताच्या 15 व्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड*
👉 *2012 - एर्डन एरुस - यानी जगातील पहिली एकट्याने मानव शक्ती प्रदक्षिणा पूर्ण केली*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1968 - आदित्य श्रीवात्सव- भारतीय अभिनेता यांचा जन्म*
👉 *1960 - अमरसिग चटकली- भारतीय गायक गीतकार याचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2020 - लालजी टंडन- मध्यप्रदेश चे 22 वे राज्यपाल यांचे निधन*
👉 *2013 - लूरेम्बॅम्ब ब्रजेशोतरी देवी भारतीय मार्शल आर्टिस्ट यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
   ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _सुविचार *_
*"वाणी, वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढी उच्च किंमत मिळेल."*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          _*सामान्य ज्ञान *_

*👉भारतीय तिरंग्यामधील सर्वात वरच्या भागातील रंग कोणता आहे?* 
*🥇केशरी रंग*

*👉आपल्या शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोण करतो?* *🥇छोटा मेंदू*

*👉शिर्डी हे धार्मिक तीर्थस्थळ कोणत्या तालुक्यातील आहे?* 
*🥇राहता तालुका*

*👉निर्माणों के पावन युग में या हिंदी कवितेचे कवी कोण आहेत?* 
*🥇 अटल बिहारी वाजपेई*

*👉अग्निपथ ही योजना कशाशी संबधित आहे?* 
*🥇भारतीय सैन्यात चार वर्ष सेवा*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _* बोधकथा *
    
*मूर्ख प्रश्न*

*एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला. त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलला विचारले, बिरबल एखाद्या नालायक माणसाशी गाठ पडली तर काय करावे? बिरबल खूप कामात होता. कामाच्या वेळी बादशाहाने असा विचित्र प्रश्न विचारलेले बिरबलला आवडले नाही. परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते. “महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ह्याच वेळी मिळेल.*

*बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आणि आपल्या एका मित्राला घरी बोलवलं. तो म्हणाला उद्या तू माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये. बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस. बादशहाने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस. घरी आल्यावर मी तुला इनाम देईन.*

*दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहाच्या दरबारात गेला. बादशहाला मुजरा करून तो म्हणाला महाराज आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न.*

*बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबलचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला. बादशहाने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. परंतु बिरबलचा मित्र गप्पच.*

*शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला, काय मूर्ख पणा चालवला आहे. तुझा मित्र तर काहीच बोलत नाही. बिरबल नम्र पणे म्हणाला महाराज , माझ्या मित्राने आपल उत्तर दिले आहे. नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलने आपलयाला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला.*
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे* 
*मुख्याध्यापक* 
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन* 
*9860214288*
‐-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा