*24 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2000 - विप्रो अंतराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत चेन्नई ची विजयालक्ष्मी सुब्रहाण्णम भारताची पहिली महीला ग्रॅडमास्टर बनली*
👉 *2014 - एर अल्जेरी फ्लाइट 5017 मॅकडोनेल डल्ला एम डी 83 प्रकारचे विमान माली मध्ये कोसळले 116 ठार*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1937 - मनोज कुमार- भारतीय,अभिनेता,दिग्दर्शक,निर्माता व पटकथालेखक यांचा जन्म*
👉 *1945 - अजिम प्रेमजी- विप्रो कंपनीचे चेअरमन याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1980 - पीटर सेल्स इंग्लिश विनोदी नाटक व गायक यांचे निधन*
👉 *2012 - राॅबर्ट लिटले- सिटी स्कॅन चे शोधक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:जो गुरुला वंदन करतो; त्याला आभाळाची उंची लाभते.* ▬▬▬########▬▬▬ *बोधकथा*
*दानाचे मोल*
*राज्यात ओला दुष्काळ पडला होता. राजा प्रतापरावांनी सार्या शेतकर्यांचा सारा माफ केल्याचे जाहीर केले. अन्नही मोफत दिले जाईल, अशी दवंडी दिली. त्यांना वाटले की, आता सगळे खूश होऊन जातील, आपली स्तुती करतील. ती स्तुती ऐकावी म्हणून धान्य घेण्यासाठी आलेल्या शेतकर्यांच्या रांगेत जाऊन ते उभे राहिले. त्यांच्या पाठीमागे दोन शेतकरी येऊन उभे राहिले. ते शेतकरी आपापसांत कुजबुजत होते. आपले महाराज शूर आहेत.* *दानशूरसुद्धा आहेत पण त्यांना व्यवहार समजत नाही.*
*दुसरा शेतकरी दबल्या आवाजात म्हणाला, का रे ? फुकटचं धान्य खाऊन वर मस्तीला आलास का ?राजांना नावं ठेवतोस ? पहिला शेतकरी म्हणाला, अगदी बरोबर बोललास. गेले महिनाभर मला काही काम न करता असं फुकटंच खाण्याची सवय लागली आहे. मस्ती आल्याशिवाय कशी राहील ? यापेक्षा महाराजांनी आपल्याकडून श्रमदानाची कामे करुन घ्यायला हवी होती. काम मगच दाम हे धोरण त्यांनी राबवायला हवं होतं. राजा प्रतापरावांनी हा सल्ला मानला. त्यामुळे दानाचा दुरुपयोग टळला*^
▬▬▬#########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ १) भारताच्या विद्यमान राष्ट्रपती पदी कोणाची निवड झालेली आहे? २) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? ३) महाराष्ट्र शासनाने मागीलवर्षी पासून कोणत्या इयत्ता साठी एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे ?
उत्तरे :१- द्रौपदी मुर्मू भोपळे,२- डॉ.राजेंद्र प्रसाद,३-पहिली. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬▬#######▬▬▬▬
■ *पाठ-टाचण सक्ती न करणे बाबत,पुन्हा निघाले आदेश..!*
■ *महाराष्ट्र सरकारने इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय*
■ *अनधिकृत ठरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – दीपक केसरकर शिक्षणमंत्री*
■ *सीबीएसई शाळांमध्ये मिळणार आता भारतीय भाषांचाही पर्याय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा*
■ *मला दोषासकट सांभाळून घेणाऱ्या पुण्यात सन्मान होणं भाग्यच; ज्य़ेष्ठ अभिनेते मोहन आगाशेंना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान*
■ *ज्याला दहावीत ४२ टक्के पडलेत, तो आज IAS अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय, यालाच लोकशाही म्हणतात: राज ठाकरे*
■ *'मी आणि माझी मुलं भारतासाठी...', एटीएसच्या चौकशीवेळी सीमा हैदरची नवी चाल?*
■ *टीम इंडियाला धावांचा डोंगर करावा लागणार सर; पाकिस्तानने ठेवले तगडे आव्हान* ▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा