*27 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
*शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांचा जन्मदिवस
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - सार्वजनिक ठिकाणी ,शासकीय इमारत,या ठिकाणी सिगारेट, गुटखा, तंबाखूच्या वस्तूची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्राचा मंञीमंडळाचा निर्णय*
👉 *2012 - लंडन येथे 30 वी ऑलिंपिक स्पर्धेची सुरवात*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1967 - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक राहूल बोस याचा जन्म*
👉 *1983 - भारतीय फुटबॉल खेळाडू साॅकर वेल्हो याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2007 - स्फोटके व शास्त्रतज्ञ तज्ञ वामन दत्ताञय पटवर्धन यांचे निधन*
👉 *2015 - भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा* ▬▬▬######▬▬▬ *बोधकथा*
▬▬▬######▬▬▬
*प्रामाणिक मुलगा*
*एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''*
*तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो.*
▬▬##########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ १) *कुठे व केव्हा ३० व्या येथे ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.?* २) भारताचे १० वे उपराष्ट्रपती कोण होते? ३) द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलिअम मंत्रालयाने केव्हा मंजूर केला?
उत्तरे :*१-२०१२ : लंडन येथे .*
२-कृष्णकांत.
३-१९९९. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया येत्या ३ महिन्यांत पूर्ण होणार-शिक्षणमंत्री केसरकर*
■ *वर्ग ५ वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी. २०२३ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याची माहिती31/07/2023 रोजीपर्यंत भरणेबाबत सूचना प्राप्त ! परीक्षा परिषद पुणे*
■ *राज्य सभेतून सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोग संदर्भात महत्त्वाची माहिती समोर!*
■ *2022-23 मध्ये 23 शिक्षणाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये दोषी शिक्षणाधिकाऱ्यांवर चौकशीअंती नियमानुसार कारवाई करण्यात येणार - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर*
■ *मोदी सरकार 2024 मध्ये पुन्हा सत्तेत आलं तर लोकशाही राहणार नाही : उद्धव ठाकरे*
■ *भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणून औरंगाबादमध्ये ‘समाजसेवका'ची काढली धिंड; चपलेने मारहाणही केली*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा