*28 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *शुक्रवार* 🛟
*जागतिक हिपॅटाटीस दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - इयार्न थाॅर्प - जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सहा सुवर्णपदक जिकंणारे पहिले जलतरणपटू ठरले*
👉 *2001 - इंदीरा गोस्वामी - आसमी लेखिका ज्ञानपीठ पुरस्कार विजेता*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1945 - जिम डेव्हिस- अमेरिकन व्यंगचिञकार याचा जन्म*
👉 *1932 - हिरेन भट्टाचार्य- भारतीय कवी आणि साहित्यीक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2016 - महाश्र्वेता देवी- भारतीय बंगाली लेखक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते पद्मभूषण, पद्मश्री,रॅमन मॅगसेस पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार यांचे निधन*
👉 *1981 - बाबुराव गोखले - नाटककार यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.* 🇳🇪 ▬▬▬#####▬▬▬ *बोधकथा* ▬▬▬#####▬▬▬
🛑 *कष्टाची कमाई श्रेष्ठ*🛑
*एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वत:साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे? चोर म्हणाले,'' आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो. तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला,'' आज तुम्ही चोरी करू श्कला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले,''महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.*
*तात्पर्य: पापाची कमाई असंतोष आणि दुःखाचे कारण बनते कष्टाची कमाई मानसिक सुख शांतता व आत्म्याला सुख देत असते.*
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १) *साबरमती आश्रमाची स्थापना गांधींनी कोठे केली?* २) भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण होता? ३) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवृत्तीचे वय किती असते?
उत्तरे :*१- अहमदाबाद गुजरात येथे .*
२- थोमास स्टीव्हन.
३-६५ वर्षे. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना गटित समितीला मुदत वाढ शासन निर्णय निर्गमित.*
■ *कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे कलम रद्द करा ;आमदारांची मागणी*
■ *कंत्राटदारांना दिला जाणारा ३० टक्के प्रोत्साहन निधी बंद करा,"आमदार होळींची विधानसभेत मागणी, समाजमाध्यमांवर संतापाची लाट*
■ **दिनांक २८ जुलै २०२३ रोजी अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्हा शाळांना सुट्टी जाहीर*
■ *शाळांमधून 'स्मार्ट फोन' हद्दपार करा, युनेस्कोच्या अहवालातून जगातील देशांना सल्ला*
▬▬▬########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा