*3 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
💧 *गुरु पोर्णिमा*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर*
👉 *2006 - एक्स पी 14 हा लघुग्रह पृथ्वीचा अगदी जवळून गेला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1952 - भारतीय कॅनेडियन लेखक रोहिनटल मिस्ञी यांचा जन्म*
👉 *1971 - विकिलीक्स चे संस्थापक ज्युलियन असाज याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1969 - द रोलिग स्टोन्सचे संस्थापक गिटार, हार्मोनियम आणि पियानो वादक ब्रायन जोन्स यांचे निधन*
👉 *1996 - हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडीत तथा राजकुमार यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▬▬▬##########▬▬▬
*सुविचार:मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.* ▬▬▬##########▬▬▬
_*आजची बोधकथा*_
▬▬▬##########▬▬▬
_*गरुड आणि कासव*_
*एकदा एक कासव जमिनीवर चालून चालून कंटाळले. आकाशातून पृथ्वी कशी दिसते ते पहावे असे त्याला वाटू लागले. मग ते पक्ष्याकडे जाऊन म्हणाले की, 'जो कोणी मला आकाशातून फिरवील व सृष्टीचे वर्णन करून सांगेल त्याला मी पृथ्वीच्या पोटातील रत्नांच्या खाणी दाखवीन.' गरुडाने ही गोष्ट कबूल केली व आकाशातून पृथ्वीवरील सर्व आश्चर्ये दाखविली. मग खाली उतरल्यावर तो कासवाला म्हणाला, 'अरे, तुझ्या रत्नाच्या खाणी कुठे आहेत ते दाखव.' त्यावेळी त्या कासवाने वेड्याचे सोंग घेऊन गरुडाला फसविण्याचे ठरविले. ती त्याची लबाडी पाहून गरुडाला फार राग आला व त्याने कासवाच्या नाजूक ठिकाणी आपली नखे रोवून त्याला मारून टाकले.*
*तात्पर्य- बोलल्याप्रमाणे वागले नाही तर लोक त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत.*
▬▬▬##########▬▬▬
*गुरुपौर्णिमा*
*मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा परमपूजनीय गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा.*
▬▬▬##########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬##########▬▬▬ *_१) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?_* *_२)अतारांकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते ?_* *_३) विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेत चालते?_*
(उत्तरे: १-डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
२-तीन महिन्यात,
३-मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून. ) ▬▬▬##########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬##########▬▬▬
■ *राष्ट्रवादीत उभी फूट; अजित पवार उपमुख्यमंत्री तर धनंजय मुंडे सह 8जणांनी घेतली मंत्री पदाची शपथ*.
● *राष्ट्रवादीसोबत पवार घराण्यात उभी फूट? पत्रकार परिषदेत रोहित पवार शरद पवारांच्या बाजूला... अजित पवार विरोधात*
● *समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शोधलं, 3 महिन्याचे संशोधन*
● *पट संख्येवर आधारित होणार संच मान्यता 2022-23*
● *5वी, 8वी शिष्यवृत्तीसह सर्व गुणपत्रके डिजिटल स्वरूपात मिळणार*
● *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 रजिस्ट्रेशन सुरु.*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा