*4 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2006 - स्पेस शटल प्रोग्राम - डिस्कव्हरीनै आंतरराष्ट्रीय अंतराळात स्थानकावर STS 121 प्रक्षेपित केले*
👉 *2009 - स्टच्यु ऑफ लिबर्टी 11 सप्टेंबर चा हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आठ वर्षांचा बंदनंतर स्टॅच्यु ऑफ लिबर्टी खुली करण्यात आली*
👉 *2015 - कोपा अमेरिका कप चिली देशाने 2015 च्या अंतीम सामन्यात अर्जेनटीनाचा पराभव करून आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये पहिले विजेते पद पटकावल*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1926 - विनायक बुवा- विनोदी साहित्यीक यांचा जन्म*
👉 *1976 - दाइजिरो कातो - जापानी मोटारसायकल रेसर याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2020 भक्ती चारु स्वामी - कृष्णा चेतणा अंतराष्ट्रीय संस्थेचे अध्यात्मिक नेते यांचे निधन*
👉 *2022 - तरुण मुजुमदार भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पद्मश्री यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▬▬▬##########▬▬▬
*सुविचार:अगदी सळल मार्गी असणे हेही एक पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.* ▬▬▬#########▬▬▬
_*आजची बोधकथा*_ ▬▬▬#########▬▬▬
*वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून ठरवायची नसते* *एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या* *किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मतआहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या* *वेळातविणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या* *वमाझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचेआयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासूनजे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.*
*तात्पर्य : कोणत्याही वस्तूची किंमत तिच्या मोठय़ा आकारावरून ठरवायची नसून, तिच्या उपयोगावरून ठरवायची असते.*
▬▬▬#########▬▬▬
© *प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ १) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले? २)आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिकणारी पहिली भारतीय महिला मुष्ठीयोद्धा कोण ? ३) सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
(उत्तरे: १-मुंबई,
२-एम.सी.मेरिकोम,
३-गोपाळ गणेश आगरकर. ) ▬▬▬##########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬##########▬▬▬
■ *शैक्षणिक साहित्याचे प्रक्षेपण होणार आता DTH वाहिनी मार्फत.. महाराष्ट्रात 5 चॅनल मार्फत पहिली ते बारावी अभ्यासक्रम ई साहित्य दिसणार.. SRG म्हणून निवड..*
■ *लवकरच शिंदेंची सुट्टी, अजित पवारच मुख्यमंत्री; मोठ्या नेत्यांचे दावे खरे ठरणार?*
■ *संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात दमदार स्वागत; गुलाबपुष्पवृष्टीतून केला आनंदाचा वर्षाव*
■ *प्रीतीसंगमावरून आशीर्वाद घेताच शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात, राज्यव्यापी दौरा करणार*
■ *अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांचे 11 मुद्द्यांची पडताळणी करून आदेश काढण्याबाबत महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित* ▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा