*6 जुलै दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
*डाॅ शामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2006 - चिनयुध्दापासुन बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथुला ही खिंड व्यापारासाठी खुली करण्यात आली*
👉 *1982 - पुणे मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान भारतातील सर्वात जास्त लांबीचा वाहतूकी करिता खुला झाला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1952 - रेखा शिवकुमार बैजल- मराठी साहित्यीक यांचा जन्म*
👉 *1986 - डेव्हिड कार्प- टम्बलरचे संस्थापक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1986 - बाबु जगजीवनराम भारताचे 4 थे उपपंतप्रधान यांचे निधन*
👉 *2002 - धीरुभाई अंबानी - भारतीय उद्योगपती, रिलायन्स संस्थापक, पद्मविभूषण यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏 ▬▬▬##########▬▬▬
*सुविचार: :उद्याचा भविष्यकाळ वर्तनानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.* ▬▬▬########▬▬▬ *बोधकथा*
▬▬▬########▬▬▬ 🛑 *मानवी जीवन* 🛑
*एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळूहळू संपूर्ण बाग रिकामी झाली.*
*एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्षात पाहिल्यावर लोहाराची परिस्थिती पहिल्या सारखीच आहे असे दिसले, राजाला आश्चर्य वाटले.*
*सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले, तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का.? तेव्हा लोहाराने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.*
*राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रडू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली, तेंव्हा राजा म्हणाला "अशी भेट वारंवार भेटत नाही."*
*मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे. मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते. पण... त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.*
*मानवी जीवन अनमोल आहे.*
*असे सुंदर जीवन परत मिळणार नाही.*
*बोध/तात्पर्य*
*या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.*
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ *१)मेदा पासून किती ऊर्जा मिळते?* *२)महाराष्टात सर्वात जास्त वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र वणाखाली आहे?*
*३) भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे झिरो माईन हे स्थान कोणत्या शहरात आहे?* उत्तरे: १-९किलो कँलरी/ग्रॅम,
२.९०℅ क्षेत्र,
३.नागपूर ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *सर्व शाळांना जोडणार ज्युनिअर सीनियर केजी (KG) वर्ग-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा*
■ *आता सरकारी* *कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक* *होणार ऑनलाइन! शासन निर्णय निर्गमित.*
■ *साहाय्यक प्राध्यापकांसाठी आता पीएचडी आवश्यक नाही; यूजीसीकडून नियमांमध्ये बदल*
■ *ईडीला पोलिसांचे अधिकार नाहीत', तमिळनाडूचे मंत्री सेंथिल यांच्या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयामध्ये सुनावणी*
■ *SAFF फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत, पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा कुवेतवर 5-4 ने विजय, मैदानात 'चक दे इंडिया'चे नारे*
▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा