गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच ध्यास हवा


*गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच ध्यास हवा*
👉 *प्रकाश हायस्कूलला ISO प्रमाणपत्राचे हस्तांतरण*
👉 *कुलगुरु श्री त्रिपाठी यांच्या हस्ते गौरव*


मनसर - शाळा हे विद्यार्थ्यांचे विकासाचे केंद्र असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच ध्यास शाळेने घ्यावा. याच जोरावर प्रकाश हायस्कूल कांद्री (माईन) या शाळेने आयएसओ प्रमाणपत्र मिळविले असून हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू श्री हरिराम त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे आयोजित आयएसओ प्रमाणपत्र हस्तांतरण सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु श्री हरिराम त्रिपाठी तर प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ रामचंद्र जोशी, अधिष्ठाता ललीता चंद्रातरे, ग्रंथपाल डाॅ. दिपक कापडे, प्रा. डॉ अमोल मांडेकर, प्रा. डॉ ऋषीकेश बलाई, मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते. प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, पारदर्शक प्रशासन व विद्यार्थी ध्येय या गोष्टीला प्राधान्य दिले. त्यामुळेच *या शाळेला अतिशय मानाचे आयएसओ प्रमाणपत्र ९००१-२०१५ हे प्रमाणपत्र मिळाले आहे.* आदिवासी भागातील शाळेने हे प्रमाणपत्र मिळवणे हा मैलाचा दगड ठरला असल्याचे प्रतिपादन कुलगुरु श्री हरिराम त्रिपाठी यांनी व्यक्त केले. शाळेच्या प्रगतीवर आनंद व्यक्त करत कुलगुरु श्री त्रिपाठी यांनी पुढच्या सत्रापासून विद्यापीठाकडून संस्कृत शिक्षक उपलब्ध करुन दिला जाईल अशी घोषणा केली. यावेळी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी शाळा प्रशासन विद्यार्थी विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


कार्यक्रमाचे संचालन सौ. कामिनी पाटील यांनी केले. तर उपस्थितांचे आभार श्री अशोक नाटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री श्याम गासमवार, श्री प्रदीप सरपाते, सौ.महानंदा इळपाते, सौ. सुचिता बिरोले, कु. ज्योत्सना मेश्राम, सौ.अनिता खंडाईत ,श्री वसंत ठकराले, श्री प्रभाकर खंडाईत, श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा