*1 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
*लोकमान्य टिळक पुण्यतिथी*
*अण्णाभाऊ साठे जयंती*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2008 - अकरा पर्वत रोहणाचा के 2 या जगातला दुसरा उंच शिखरा वर मृत्यु झाला*
👉 *1920 - असहकार चळवळ आरंभ*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1920 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म*
👉 *1932 - हिन्दी चित्रपट सृष्टीतील अभिनेञी मीना कुमारी याचा जन्म*
👉 *1948 - मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2008 - मार्कसवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिसन सुरजित यांचे निधन*
👉 *1920 - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुबई येथे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.. ▬▬▬########▬▬▬
*यशाचे गमक*
*महान शास्त्रज्ञ न्यूटन बागेत विचार करीत बसला होता. तितक्यात त्याला नोकराने हाक दिली. महाराज ! न्यूटन विचारात दंग होता. नोकराने पुन्हा साद घातली. महाराज ! आता न्यूटनची नजर नोकराकडे वळली तसा तो नोकर म्हणाला, महाराज ! बाहेर एक गृहस्थ आपणाला भेटण्यासाठी आलेत. ते आपणाला काही प्रश्न विचारु इच्छितात. खूप लांबून आलेत. न्यूटन म्हणाला, पाठव त्यांना इकडे. ते गृहस्थ आत आले.*
*न्यूटनला म्हणाले, क्षमा करा महाराज, मी अडाणी आहे. आपला लौकिक ऐकून आलोय. मला शहाणं व्हायचं आहे. मी काय करु ? न्यूटन म्हणाला, मित्रा, शहाणं होऊन तू काय करणार आहेस ? या प्रश्नावर तो गृहस्थ म्हणाला, मला तुमच्या यशाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. त्याचे उत्तर ऐकून न्यूटन म्हणाला, मित्रा ! एकच महामंत्र लक्षात ठेव. मन सैरभैर होऊ देऊ नकोस. तुला हवं ते ज्ञान मिळेल. पण त्यासाठी न चळणारं अवधान धारण करायला शिक. माझ्या यशाचं रहस्य हेच आहे. एकाग्र मनाला काहीही अशक्य नाही.*
▬▬▬########▬▬▬
*लोकमान्य टिळक पुण्यतिथी*
*बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.*
▬▬▬#########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ १) *फकीरा कादंबरी चे लेखक कोण आहेत?* २) स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ब्रीद वाक्य कोणाचे आहे? ३)१९७५ साली कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला?
उत्तरे :*१- अण्णाभाऊ साठे.*
२- लोकमान्य टिळक
३-निराद सी. चौधरी ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ **पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे पुण्यातील काही शाळा-महाविद्यालयांना सुट्टी*
■ *मन सुन्न करणारी घटना! नववीत शिकणाऱ्या मुलीला शाळेतच हृदयविकाराचा झटका अन् क्षणार्धात मृत्यू*
■ *14 दिवस काहीच का झालं नाही?' मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल*
◼️ *शिक्षक भरती पूर्वी बिंदू नामावली काटेकोर तपासणी करण्याची मागणी*
■ *राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार, दोन महिने मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचा अंदाज*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा