*12 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *शनिवार* 🛟
*आंतरराष्ट्रीय युवा दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1989 - जागतिक मराठी परिषद कुसुमाग्रज याचा अध्यक्षतेखाली पहिली परिषद सुरु झाली*
👉 *2022 - सलमान रश्दी - एंग्लो इंडीयन याचावर चौटोका, न्यूयॉर्क अमेरिकेत एका सार्वजनिक कामात हल्ला झाला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1948 - फकीरा मुजाजी शिदे-कवी ,समीक्षक व अनुवादक याचा जन्म*
👉 *1960 - इस्माईल श्राॅफ- भारतीय चित्रपट दिग्दर्शक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1984 - आनंदीबाई जयवंत-कवी, समीक्षक व अनुवादक याचे निधन*
👉 *2022 - अंशु जैन-भारतीय ब्रिटिश बॅकर, ड्युश बॅकेचे सह मुख्य कार्यकारि अध्यक्ष याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव.* 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬#######▬▬▬
*स्वामीभक्त हत्ती*
▬▬▬#######▬▬▬
एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.
काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.
वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले.
सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.
त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या
माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.
*तात्पर्य: निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.*
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬
१) शिकागो शहराची स्थापना केव्हा करण्यात आली? २) गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? ३) भारतीय संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
उत्तरे :१)१८३३.
२) भाऊसाहेब बांदोडकर.
३-विक्रम साराभाई. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ **शिक्षण विभागातील गैरप्रकार रोखण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार।।शिक्षण विभागात येणार DIGITIZATION।। War against curruption।।.*
■ *रद्द झालेल्या महाभरती परीक्षेचे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार.*
■ *भारतीय दंड संहितेतील ब्रिटिशकालीन राजद्रोहाचं कलम रद्द करणार; CrPC दुरुस्ती विधेयक सादर करताना गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा*
■ *अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण? उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटची स्थापना*
■ *अखेर नवाब मलिकांना जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा*
■ *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा POP मूर्तीची मुभा, प्रतिज्ञापत्रातून 4 फूट उंचीची अट वगळली*
■ *आमदारांचा संताप, पत्रकाराला मारहाण, जळगाव प्रकरण.*
■ *आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर*
▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा