*17 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1997 - उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान*
👉 *2008 - एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्णपदक जिकंणारे मायकल फेल्पस हे पहिले खेळाडू ठरले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1944 - लैरी एलिसन - ओरॅकल कार्पोरेशन चे सहसंस्थापक याचा जन्म*
👉 *1949 - विनोद बेडेकर - भारतीय इतिहासकार व लेखक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1909 - मदनलाल धिगंरा - क्रांतिकारी याचे निधन*
👉 *2005 - जाॅन.एन.बायहॅकल - हबल स्केप टेलिस्कोप चे सहनिर्माते याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव.* 🇳🇪 ▬▬▬########▬▬▬ *बोधकथा* ▬▬▬#######▬▬▬
*स्वामीभक्त हत्ती*
▬▬▬#######▬▬▬
एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.
काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.
वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता. त्याने राजाला असा सल्ला दिला,”महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा.” राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले.
सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.
त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या
माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.
*तात्पर्य: निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.*
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ १) शिकागो शहराची स्थापना केव्हा करण्यात आली? २) गोव्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? ३) भारतीय संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
उत्तरे :१)१८३३.
२) भाऊसाहेब बांदोडकर.
३-विक्रम साराभाई. ▬▬▬########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा