*18 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *शुक्रवार* 🛟
*वसंतराव नाईक पुण्यतिथी*
*सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2008 - हक्कभंगाची कार्यवाही होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तान चे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ याचा राजीनामा*
👉 *2005 - जावा बेटावर वीज गेल्यामुळे 10 कोटी लोक अंधारात*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1967 - दलेर मेहंदी- पंजाबी पाॅप गायक याचा जन्म*
👉 *1934 - गुलजार-गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक पद्मभूषण, अकादमी पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2012 - रा.की.रंगराजन- भारतीय पञकार आणि लेखक याचे निधन*
👉 *2008 - नारायण धारप- रहस्य कथालेखक याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:दान देताना बघावे आपले दान योग्य वक्तिला देतो की नाही.* 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬########▬▬▬
*खरी नक्कल*
▬▬▬########▬▬▬
भोजराजाकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.
भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखांन आला, तशाच तऱ्हेनं निघून जाऊ लागला.
दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही. त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून, आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला.
त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, ‘अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजर करण्याचं साधं सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.’
बहुरुपी म्हणाला, ‘महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांचं घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.’
बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याल तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या.
▬▬▬##########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬##########▬▬▬ १) आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण आहेत? २) महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री कोण होते? ३) पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने कोणत्या साली राजीनामा दिला?
उत्तरे :१) नेताजी सुभाष चंद्र बोस.
२) वसंतराव नाईक.
३-२००८. ▬▬▬######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬######▬▬▬
■ *सन 2005पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावे व इतर प्रश्नाकरिता शिक्षक आमदार यांचे आमरण उपोषण*
■ *शिक्षण हक्क कायद्यात शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त दुसरी कर्तव्ये देण्याची तरतूद नाही -मुंबई उच्च न्यायालय*
■ *शाळेतील मध्यान्ह आहाराची जबाबदारी शिक्षकांना देता येणार नाही; केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली*
■ *पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्पेशल वॉर्ड; राज्यातील दुसराच प्रयोग*
■ *नागपूर खंडपीठाचं सुटीच्या दिवशी कामकाज, विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशाचा मार्ग मोकळा*
■ *आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांनी शिंदे-फडणवीस सरकारला ठणकावलं*
■ *कॅगच्या रिपोर्टमुळे मोदी सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह? आयुष्मान भारत ते द्वारका एक्सप्रेसवे 7 योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा दावा.*
■ *इस्रोच्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! विक्रम लँडर प्रोपल्शन मॉडेलपासून वेगळा; चांद्रयान-3 लवकरच चंद्रावर उतरणार*
▬▬▬########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा