*2 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟
*वायुसेना दिवस*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2022 - विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश, भारत येथे संशयास्पद गॅस गळतीमुळे किमान53 लोक जखमी*
👉 *2001 - पुल्लेला गोपीचंद- भारतीय बॅडमिंटन खेळाडू ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1948 - तपन कुमार सरकार - भारतीय अमेरिकन इलेक्ट्रीकल अभियंता आणि शैक्षणिक याचा जन्म*
👉 *1999 - इलावेनिल वालारिवन - भारतीय रायफल नेमबाज सुवर्णपदक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1978 - एॅन्टोनी नोगेस - मोनॅको ग्रामपीचे संस्थापक यांचे निधन*
👉 *1922 - ॲल्कझांडर ग्रॅहम वेल - अमेरिकन शास्ञज्ञ , टेलिफोन चे संशोधक याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂*सुविचार:शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेले असावी.* ▬▬▬#######▬▬▬
*बढाईखोर माणूस*
▬▬▬#########▬▬▬
एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्यापाजार्यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.
*तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.*
▬▬▬########▬▬▬
© *प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १)जादूगार रघुवीर यांचे नाव काय? २)'डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कोणत्या शहरात करण्यात आली? ३)पहिली भारतीय महिला केंद्रीय मंत्री कोण?
उत्तरे :१-रघुवीर भोपळे,२-पुणे,३-राजकुमारी अमृत कौर. ▬▬▬#######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *पुढील टप्पा आता थेट चंद्रच, चांद्रयान -3 चा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु, 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत*
■ *देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला, ही गोष्ट कोणी विसरू शकत नाही : पंतप्रधान मोदीचं स्वागत करताना शरद पवारांची स्पष्टोक्ती*
■ *स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी आजही सुनावणी नाही; राज्यातील महापालिका, नगरपालिका, झेडपीच्या निवडणुका कधी?*
■ *बनावट औषधांना आळा बसणार; आजपासून 300 औषधांच्या पॅकेजवर QR कोड अनिवार्य*
■ *भारतात रंगणार WWE चा रणसंग्राम! भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा संपली, तारीखही ठरली* ▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा