*25 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *शुक्रवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - सरोदवादक अमजद अली खाॅ या मध्यप्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर*
👉 *1998 - एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकाया जगप्रसिद्ध विश्वकोशातील संपादकीय आवृत्तीचा आयातीवर भारत सरकारने बंदी घातली या आवृत्तीतील सिमा चुकीचा दाखवल्यामुळे जम्मु कश्मीर या राज्याविषयी चुकीची माहिती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1994 - भारतीय लेखक आणि कांदबरीकार काजोल आयकट याचा जन्म*
👉 *1941 - अशोक पत्की - राष्ट्रीय पुरस्कार सम्मानित प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक आणि संगीतकार मिले सुर तुम्हारा हमारा , पुरब से सुर्य उगा या गीताचे रचनाकार याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2013 - रघुनाथ पानीग्रही- भारतीय गायक-गीतकार यांचे निधन*
👉 *2012 - नील ऑर्मस्टाॅन्ग - चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂*सुविचार: चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनाचा सहवास अधिक शितल असतो* 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬########▬▬▬
*एकमेकांची सोबत घेऊ*
▬▬▬#########▬▬▬
एका गावात दोन भावंड आपल्या माता पित्यांसोबत एकत्र रहात असत. भावंड तशी समजुतदार होती, पण कधी कधी त्यांचे भांडण होत असे आणि परिस्थिति मारामारी पर्यन्त पोहचे. त्यांच्या आई वडिलांना खुप काळजी वाटे, पण करणार काय? समजवून सांगत त्यांना.
काही काळ शहाण्यासारखे वागत पण नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
काही वर्षांनी वृद्ध माता पिता मृत्युमुखी पडले. आता दोघे भाऊ पोरके झाले. त्यांना आता समजावायला कोणी नव्हते. थोड़े दिवस शांततेत गेले पण आता घराची-संपत्तिची वाटणी करायची वेळ आली. वाद सुरु झाला. दूसरा कसा आधाशी , स्वार्थी असे आरोप होउ लागले. गुंता काही सुटेना. ते गावातल्या एका आजोबांकडे गेले. त्यांनी आजोबांना सगळी हकीकत सांगितली. आजोबा अनुभवी होते, त्यांनी परिस्थिति लगेच ओळखली.
त्यांनी दोघा भावांपैकी एका भावाला विचारले "तुझा दुसर्या भावावर विश्वास आहे?" तो भाऊ म्हणाला "बिलकुल नाही"
"बर मग तुला तुझ्यावर विश्वास आहे?" आजोबांनी विचारले. "अर्थात हो" त्याने उत्तर दिले.
आजोबांनी हे दोनही प्रश्न दुसर्या भावाला विचारले. त्यानेही हेच उत्तर दिले.
आजोबांनी दोघांना उद्देशून म्हणले "तुम्हाला दोघांनाही स्वतःवर विश्वास आहे, पण दुसर्यावर नाही, हे दुर्दैवी आहे. पण हा गुंता सोडवायचा असेल तर मी सांगतो ते करा. तुमच्यापैकी एकाने त्याच्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करून संपत्तीचे दोन समान भाग करा आणि दुसर्याने त्यातला एक भाग निवडा. तुमच्या कोड्याचे हेच एकमेव उत्तर आहे."
दोघा भावांना ही युक्ति पटली. आणि त्यांनी तसेच केले. प्रश्न सुटला. भविष्यात जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती आली तेव्हा तेव्हा त्यांनी याच प्रकारे ती परिस्थिती हाताळली. पुढे त्यांची भांडणे कमी होऊ लागली. दोघेही एकमेकांचा विचार करून वागू लागले आणि आनंदाने राहू लागले.
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण? २) हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये किती ठार झाले होते? ३)कोणी आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले?
उत्तरे :१) नील आर्मस्ट्रॉंग.
२) ४३.
३-गॅलेलियोने. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *राज्यात विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणीं2 पदांसाठी जिल्हा परिषद मार्फत भरती प्रक्रिया*
■ *ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन.*
■ *'वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक मंत्री चंद्रकांत पाटील*
■ *शासकीय धोरणावर राज्यातील अधिकारी – कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष परत एकदा आंदोलनात्मक पवित्रा ! *
■ *शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय ! - आता वर्षातून दोनदा होणार दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा*
■ *भारताच्या कामगिरीचं गुगलकडूनही कौतुक!*
■ *राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री*
■ *भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द, वेळेत निवडणुका न झाल्याने युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची कठोर कारवाई*
▬▬▬#########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा