*31 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1971 - अमेरिकन अंतराळवीन डेव्हिड स्काॅट हे चंद्रावर मोटारगाडी चालवणारे पहिले मानव बनले तर चंद्रावर पाऊल ठेवणारे सातवे मानव ठरले*
👉 *1996 - पांडुरंगशास्ञी आठवले - याना मॅगसेस पुरस्कार जाहीर*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1940 - शिवाजी सावंत - मृत्युजंय कांदबरीकार लेखक व निर्माते यांचा जन्म*
👉 *1979 - युवन शंकर राजा- भारतीय गायक गीतकार व निर्मात्या याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2012 - काशीराम राणा - भारतीय राजकारणी लोकसभा सदस्य यांचे निधन*
👉 *1973 - ताराबाई मोडक -शिक्षणतज्ञ बालमंदिराच्या निर्मात्या याचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये.* 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬########▬▬▬
*राजाचे गर्वहरण*
▬▬▬########▬▬▬
एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला.
राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला,’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारे.त्यावर पंडीतजी म्हणाले,महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.
*तात्पर्यः- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.*
▬▬▬######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬######▬▬▬ *१) बाल मंदिराच्या निर्मात्या कोणाला म्हणतात?* *_२) भारताचे तेरावे राष्ट्रपती कोण होते?_* *_३) मृत्यूजय कादंबरीचे लेखक कोण?_*
(उत्तरे: १-ताराबाई मोडक,
२-प्रणव मुखर्जी,
३-शिवाजी सावंत. ) ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर*
■ *राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजाळे यांनी राबवलेले उपक्रम राज्यभरात राबविण्याची गरज - दिलीप वळसे पाटील*
■ *अंगणवाडी ते दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार… सरकारने घेतला हा निर्णय*
■ *Pcmc : शिक्षण विभागामार्फत सक्षमपणे शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी १८ सदस्यीय संघाची स्थापना*
■ *उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा? मविआच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगण्यात आलं?*
■ *बाबा' माझा बालविवाह करू नका, रक्षाबंधन निमित्ताने विद्यार्थिंनींकडून वडिलांना पत्र; नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम.*
■ *'भाऊराया, जुनी पेन्शनच्या रूपानं ओवाळणी दे'; नाशिकमधून दोन हजार राख्या पाठवत भगिनींची आर्त हाक*
■ *आशिया चषकासाठी विराट, रोहितसह टीम इंडिया श्रीलंकेत दाखल, केएल राहुल भारतातच!*
▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा