8 ऑगस्ट दिनविशेष


*8 ऑगस्ट दिनविशेष 2023 !*

🛟 *मंगळवार* 🛟


*भारत छोडो आंदोलन *
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1998 -संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेञासाठी खुल्या झाल्या*
👉 *2000 - महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कार पुण्याचे वेदमुर्ती मोरेश्र्वर घैसास गुरुजी याना जाहिर*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1932 - दादा कोडगे भारतीय अभिनेता लैखक दिग्दर्शक संवादलेखक याचा जन्म*
👉 *1934 - शरद पुजारी- भारतीय अभिनेता लेखक व कादंबरीकार याचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1998 - डाॅ सुमती क्षेञमाडे- लेखक व कादंबरीकार याचे निधन*
👉 *2013 - शिवाजी तुपे - ज्येष्ठ निसर्ग कवी याचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
   ▬▬▬#######▬▬▬
  *सुविचार: शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते.*                                           ▬▬▬#######▬▬▬                                                            🇳🇪 *🇨🇮.                                                                                                                                                                                                                                                                 *बोधकथा*                                                                   ▬▬▬######▬▬▬ 
   *खरा शिक्षित कोण ?*              
▬▬▬######▬▬▬ 
विश्वविख्यात तत्त्ववेत्ता सॉक्रेटिस याच्याकडे एकदा दोन तरुण त्याचे शिष्यत्व पत्करण्यासाठी गेले. तो त्या दोघांनाही एका सरोवराकाठी घेऊन गेला व त्याने त्या दोघांनाही एकच प्रश्न विचारला, "तुम्हाला या सरोवरात काय दिसते?"
            पहिल्याने उत्तर दिले, "मला या सरोवरात माझे प्रतिबिंब दिसत आहे. तर दुसन्याने उत्तर दिले, "मला या सरोवरात माझ्या प्रतिबिंबाशिवाय त्यात असलेले मासे, कासवे, बेडूक इत्यादी जलचर प्राणी दिसत आहेत." 
त्याचे तसे उत्तर ऐकून सॉक्रेटिसने पहिल्या तरुणाला शिष्य करून घेण्यास नकार दिला, तर दुसऱ्याचा आपला शिष्य म्हणून स्वीकार केला. 
   सॉक्रेटिसचा एक मित्र त्या वेळी त्याच्याबरोबर होता. त्याने त्या पहिल्या तरुणाला शिष्य करून घेण्यास नकार दिल्याचे कारण विचारले. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, "पहिल्या तरुणाने सरोवरात पाहिले असता, त्याला फक्त त्यात स्वतःचे प्रतिबिंब दिसते. 
याचा अर्थ शिक्षण घेतल्यावर त्याचा उपयोग तो केवळ स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे उदरभरण करण्यासाठी करणार. 
  भोवतालच्या समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत, या गोष्टीचा त्याच्या मनात विचारही येणार नाही. मग अशा तरुणाला शिक्षण देण्यात मी माझा वेळ फुकट कशाला घालवू?"
▬▬▬#######▬▬▬ 
         *प्रश्नमंजुषा*                                                       ▬▬▬#######▬▬▬                                             १) लाल बाल पाल या नावाने भारतातील थोर पुरुषांना ओळखले जाते?                                                                                        २) भीमा नदीला पंढरपुरात कोणत्या नावाने ओळखले जाते?                                                                                         ३) क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर या नावाने कोणाला ओळखले जाते? 
उत्तरे :१ लाला लजपतराय,गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल. शिंदे,२-चंद्रभागा.
३-सचिन तेंडुलकर.                                                                                                                        ▬▬▬#######▬▬▬                                            *ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *'त्या' रद्द झालेल्या महाभरती परीक्षा शुल्काचे काय?,आता पुन्हा नव्याने शुल्क 'वसुली'; परीक्षार्थींमध्ये संताप*
■ *आणखी किती दिवस मुंबईकरांचे हाल होणार? सहाव्या दिवशीही बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच*
■ *राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी*
■ *पाकिस्तानी संघाला वर्ल्ड कपचं टेन्शन! भारतात खेळण्याचं दडपण? बाबर आझमच्या टीमसोबत मानसोपचार तज्ज्ञ पाठवण्याचा विचार*
■ *जाको राखे साइयां, मार सके न कोई... 13 वर्षांच्या मुलीनं प्रसंगावधान दाखवत वाचवला स्वतःचा जीव.*
■ *महापुरुषांच्या जयंतीला डीजे न लावता नोकरी महोत्सव भरवा, मंत्री छगन भुजबळांचे आवाहन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂*चले जाव चळवळ १९४२*,   
         *भारत छोडो आंदोलन*    
               *ऑगस्ट क्रांती*

                हे ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र्य  प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

⚱ *भारत छोडो आंदोलन*
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. 
             सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली.

💎 *चळवळीची कारणे*
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये 
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
 
⚖ *छोडो भारत चळवळीची* *अपयशाची कारणे*
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद

 🏮 *इतर कारणे*

                  दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

🙋‍♂ *चलेजाव आंदोलन (१९४२)*
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात, ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
▶ प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.
बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
▶  या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था
सांभाळली.
▶ सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
▶ या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
▶ काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
▶ व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
▶ मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
▶ भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
▶ निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
▶ स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
🇮🇳 *भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले*
      क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादी गटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.

👮 *नेताजी सुभाष चंद्र बोस*
                      भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

🔫 *आझाद हिंद सेना*
           ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
🚣 *भारतीय नौदलाचा उठाव*
           आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

🕵 *माउंटबॅटन योजना*
                       २४ मार्च १९४७ रोजी माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिध्द करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.
         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे* 
*मुख्याध्यापक* 
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन* 
*9860214288*
‐-------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा