पथनाट्यातुन दिला व्यसनमुक्तीचा संदेश


*पथनाट्यातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश*


👉 व्यसनमुक्तीसाठी प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार


मनसर - रोजचा एक प्याला जिवन कसे उद्ध्वस्त करु शकतो याचे जिवंत चित्र प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन च्या विद्यार्थ्यांनी उभे करुन व्यसनापासून दूर होण्याचे आवाहन केले.


माॅयल लिमिटेड कान्द्री-माईन व प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन यांच्या संयुक्त विद्यमानाने कान्द्री-माईन व बिडीसी परिसरात व्यसनमुक्ती संदर्भात पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात व्यसनमुक्ती, कामगारांची नियमितता तसेच हिन्दी विषय बढावा या विषयावर आधारित पथनाट्य प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी माॅयल प्रबंधक श्री मनोज मोढे, कर्मिक अधिकारी श्री ललीत अरसडे, एच.आर. येथिल श्री घरडे, मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते. माॅयल कामगारांनी मोठ्या संख्येने पथनाट्याचा लाभ घेवून व्यसनमुक्तीचा निर्धार घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा