प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन येथे स्वातंत्र्य दिन साजरा


*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन येथे स्वातंत्र्य दिन साजरा*



मनसर - प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत कान्द्री-माईन चे सरंपच श्री परमानंद शेंडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बॅकेचे मॅनेजर श्री प्रियदर्शनी गांवडे, उद्योजक श्री संजय पन्नासे, रेन्बो काॅन्व्हेंटचे पालक सदस्य श्री मनजीत बहेलिया, माजी मुख्याध्यापक श्री उमेशकुमार चौकसे, माॅयल कान्द्री-माईनचे मॅनेजर श्री मनोज मोढे, कर्मिक अधिकारी श्री ललीत अरसडे, प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन चे प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्या नंतर कॅनरा बँकेकडून शिष्यवृतीचे वाटप करण्यात आले. तसेच माॅयल कान्द्री-माईन कडून वर्ग 10 व 12 चा विद्यार्थ्यांना नमन करमलाल, सरगम कठौते, सौरभ ठाकरे, स्वाती कठौते यांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय मतदार प्रश्न मंजुषा स्पर्धेत अव्वल आलेल्या हर्षिता कठौते, खुशी मोकाट, स्वाती कठौते यांना प्रमाणपत्र देऊन सम्मानित केले. शाळा समितीचे सदस्य लक्ष्मी खोब्रागडे यांनी *ऐ मेरे वतन के लोगो....*.हे देशभक्तीपर गीत गाऊन सर्व श्रोत्याना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन श्री विजय लांडे यांनी तर आभार सौ कामिनी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री श्याम गासमवार, श्री अशोक नाटकर, श्री प्रशांत सरपाते, सौ महानंदा इळपाते, सौ.सुचीता बिरोले, सौ.अनिता खंडाईत, कु ज्योत्सना मेश्राम, कु.प्रियंका खडसे, श्री ठकराले बाबू, श्री प्रभाकर खंडाते, श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले. यावेळी पालक श्री भैय्यालाल खोब्रागडे, श्री लक्ष्मण शेंडे, श्री भरणे ,बोन्द्री येथील पोलिस पाटील अनुसया खोब्रागडे, ग्राम पंचायत सदस्य प्रिती घरडे, कान्द्री-माईन चे पोलिस पाटील श्री पौणीकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा