गरजवंताना मोफत पाठ्यसामुग्रीचे वितरण


*गरजवंतांना मोफत पाठ्यसामुग्रीचे वितरण*


रामटेक - युनियन बँक कान्द्री (कन्हान)द्वारा गरजवंत 30 आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यसामुग्रीचे मोफत वाटप करण्यात आले.
मनसर कांद्री येथील प्रकाश हायस्कूल येथे युनियन बँक कान्द्री (कन्हान)शाखेचा वतीने वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांद्री (कन्हान) येथील युनियन बँकेचे मॅनेजर रवि पाटील ,बॅकेचे कर्मचारी आशिष तसेच शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. युनियन बॅकेचे मॅनेजर रवि पाटील यांनी सामाजिक भावनेतून गरीब गरजवंत विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाला पाहिजे या हेतूने ही मदत असल्याचे सांगितले. तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव कार्यतत्पर असल्याची ग्वाही मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे यांनी दिली. यावेळी 30 गरजवंत आदिवासी विद्यार्थ्यांना नोटबुक व पेनचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्याम गासमवार ,विजय लांडे ,महानंदा ईळपाते ,प्रशांत सरपाये ,बिरोले मॅडम,अनिता खंडाईत, ज्योत्स्ना मेश्राम,अशोक नाटकर, मिलिंद वाघमारे , प्रभाकर खंडाते,ठकराले बाबु,प्रयत्नशिल होते कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार सौ. कामिनी पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा