आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध


*आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध*



*रोटी बँक ट्रस्टची ग्वाही*


*प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेजला भेट* 

मनसर - आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी कटिबद्ध असून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन रोटी ट्रस्ट नागपूर तर्फे 
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कांद्री माईन येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले. 
                  आज (ता ५) रोटी बँक ट्रस्ट नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन ला सदिच्छा भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटी बँक ट्रस्टचे अध्यक्ष श्री चंद्र बगडीया, पदाधिकारी श्री संजय सरकार, श्री राकेश गुप्ता, श्री राजेंद्र दुवा,  श्री संजय पन्नासे,  श्री रिजवान व मॉयल येथील कार्मिक अधिकारी श्री. ललित अडसरे उपस्थित होते. 


यावेळी रोटी बँक ट्रस्टचे अध्यक्ष श्री. चंद्र बगडिया यांनी आदिवासी बहुल भागातील शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगुज करुन सर्व विद्यार्थ्यांना शक्तीवर्धक खाऊचे वाटप केले. यावेळी मॉयल येथील कार्यक्रमात व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केलेल्या विद्यार्थ्यांचा कार्मिक अधिकारी श्री. ललित अडसरे व उपस्थितांच्या हस्ते बक्षीस देऊन विशेष कौतुक करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक 
श्री. मिलिंद वानखेडे यांनी रोटी बँक ट्रस्ट, नागपूर तर्फे शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. 
कार्यक्रमाचे संचालन सौ. कामिनी पाटील यांनी तर आभार  श्री. अशोक नाटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री.श्याम गासमवार, श्री विजय लांडे,  श्री प्रशांत सरपाते,  श्रीमती सुचीता बिरोले,  श्रीमती अनिता खंडाईत, कु.ज्योत्सना मेश्राम,ठकराले बाबु, प्रभाकर खंडाते यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा