Independenceday2023 एकसंघ राष्ट्रनिर्मितीसाठी सज्ज व्हा


*एकसंघ राष्ट्रनिर्मितीसाठी सज्ज व्हा*
*धर्मराज शैक्षणिक परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा*


कन्हान - धर्म, भाषा, प्रांत यांच्या आडून एकसंघ राष्ट्रनिर्मितीला तडा दिला जात आहे. उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकसंघ राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीने तयार व्हावे, असे आवाहन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.
धर्मराज शैक्षणिक परिसरात ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.


 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक श्री मेहर गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री धनंजय कापसीकर, श्री रोशन भोयर, श्री कुंभलकर, माजी सैनिक श्री नितेश गभने, माजी सैनिक श्री विशाल देऊळकर, माजी सरपंच श्री जयराम मेहरकुळे, माजी सदस्य सौ अरुणा हजारे, श्रीमती बिस्ट, मुख्याध्यापक (माध्यमिक) सौ तिळगुळे, उपमुख्याध्यापक श्री मेश्राम, मुख्याध्यापक (प्राथमिक) श्री खिमेश बढिये उपस्थित होते.
यावेळी संगीत शिक्षक श्री नरेंद्र कडवे यांनी संचासह देशभक्ती गीत सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री मोहन भेलकर यांनी तर आभार श्री नरेंद्र कडवे यांनी मानले.


कार्यक्रमात श्री हरिष केवटे, श्री प्रकाश डुकरे, श्री शिवचरण फंदे, श्री उदय भस्मे, श्री विलास डाखोळे, सौ खंते, श्रीमती बालमवार, श्री दिनेश ढगे, श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री अमीत मेंघरे, सौ चित्रलेखा धानफोले, कु शारदा समरीत, कु हर्षकला चौधरी, श्री अनिल मंगर, श्री धर्मेंद्र रामटेके, श्री संतोष गोन्नाडे, श्री सतीश राऊत, श्री तेजराम गवळी, श्री विजय पारधी, श्री हरिष पोटभरे, श्री सचिन गेडाम, श्री राजू भस्मे, श्री किशोर जिभकाटे, कु अर्पणा बावनकुळे, कु प्रिती सुरजबंसी, सौ गेडाम, श्रीमती मेहर, श्रीमती निंबाळकर, श्रीमती कोल्हे, कु पूजा धांडे, कु कांचन बावनकुळे, सौ वैशाली कोहळे, कोकीळा सेलोकर, श्री प्रशांत घरत, माला जिभकाटे, शिक्षकेतर कर्मचारी श्री महादेव मुंजेवार, श्री राजकपूर साखरे, सौ सुनीता मनगटे, सौ सुलोचना झाडे, सौ नंदा मुद्देवार, सौ पूजा नाटकर, सौ परी अनकर यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा