*1 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *शुक्रवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2022 - श्रीलंका आर्थिक आणिबाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने $ 2.9 अब्ज अमेरिकन डॉलर ची तात्पुरती मदत करण्यात मान्यता दिली*
👉 *2022 - सप्टेंबर मधील सर्वाधिक तापमान फ्रान्स क्रिक कॅलिफोर्निया अमेरिका येथे 127 F (53 C) तापमानाची नोंद झाली आहे सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक तापमान असणारी नोद*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1931 - अब्दुल हक अंसारी- भारतीय शास्त्रज्ञ आणि विव्दान यांचा जन्म*
👉 *1970 - पद्म लक्ष्मी - भारतीय अमेरिकन अभिनेञी आणि लेखक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2008 - थाॅमस जे बाटा - बाटा शु क॔पनीचे संस्थापक यांचे निधन*
👉 *2022 - मेरी राॅय- भारतीय शिक्षणतज्ञ आणि कार्यकर्त्या यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *सुविचार:दुर्जनांला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.*. 🇳🇪 *🇨🇮. ▬▬▬########▬▬▬ *स्वप्न आणि सत्य*
▬▬▬########▬▬▬
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्या पित्याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते. मग सत्याने प्रयत्न केला मात्र त्याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी राहिले. शेवटी थकून ते पुन्हा एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यात सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’
*तात्पर्य:- खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहला हवे.
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ *१)२०११च्या जंगणने नुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? २)'घरचा पुरोहित' ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? ३) RTI ACT 2005 नुसार अतिशय तातडीच्या (जीवन किंवा मृत्यूच्या)परिस्थितीत किती कालावधीत माहिती देणें बंधनकारक आहे? उत्तरे: (१.९२५, २.भास्करराव जाधव,
३. ४८ तास ) ▬▬#########▬▬▬▬ ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *पिंपरी चिंचवड:शाळा संस्थाचालकांकडून शासनाची आर्थिक फसवणूक; मुख्याध्यापिकेचा मानसिक छळ*
■ *18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन; 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार*
■ *सीरम इन्स्टिट्यूट लवकरच डेंग्यू आणि मलेरियावर लस बनवणार; पूनावाला यांची मोठी घोषणा.*
■ *2 सप्टेंबरला टीम इंडिया अन् पाकिस्तान यांच्यात महामुकाबला;*
▬▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा