*11 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2007 - रशियाने सगळ्यात मोठ्या बाॅम्ब ची चाचणी केली याचे नाव सगळ्या बाॅम्बचा बाप असे ठेवण्यात आले*
👉 *2001 - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती मध्ये दहशतवाद्यानी दोन प्रवासी विमान घुसून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1915 - पुपुल जयकार- सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय कला आणि पुरस्कृते यांचा जन्म*
👉 *1939 - चार्लस गेशेके - एडाॅब सिस्टम चे संस्थापक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2022 - कृष्णम राजु- भारतीय अभिनेते आणि खासदार यांचे निधन*
👉 *2022 - स्वामी स्वरूपानंद सरस्वती - भारतीय धार्मिक गुरुवार शंकराचार्य यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂*सुविचार:लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.* 🇳🇪 🇨🇮.
*आजची बोधकथा सोन्याची कुदळ* .
▬▬#######▬▬▬
एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपत्ती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्याला खोटे का सांगितले? मग त्याच्या आत्म्याने म्हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.
*तात्पर्य : संन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे.जो परिश्रम करत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख आवश्य येते.*
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ *१)७५०१पेक्षा जास्त लोकसंख्यासाठी सदस्यसंख्या किती असते? २)भारतातील व्याग्र प्रकल्प योजनेचे जनक कोण? ३)भारतातील सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू आणि गुटखा यांच्या सेवणावर बंदी करणारे पहिले राज्य कोणते?*
उत्तरे:१.सतरा
,२.कैलास सांकला
,३.महाराष्ट्र. ▬▬▬#######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *कायम विनाअनुदानित शाळांना कधीच अनुदान द्यायचं नाही असे ठरले होते - अर्थमंत्री अजित पवार.*
■ *शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे शालेय शिक्षणमंत्री पद जाणार? 60 हजार विनाअनुदानित शिक्षकांना फटका बसणार!*
■ *वाढीव 20%,40% व 60% शाळा शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराच्या बळी, सोमवारपासून मुंबईत आंदोलन*
■ *धक्कादायक : राज्यातील सरकारी शाळा बंद होणार?*
■ *जुनी पेन्शन योजना बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निकाल पेन्शन हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे.*
▬▬▬########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा