13 सप्टेंबर*दिनविशेष 2023 !
🛟बुधवार 🛟
*जागतिक चॉकलेट दिन*
🌍 घडामोडी🌍
👉१९०० : पुलांग लुपाची लढाई.
👉१९२९ : लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.
👉१९९९ : मॉस्कोमध्ये दहशतवाद्यांचे बॉम्बस्फोट. ११९ ठार.
👉२००३ : ज्येष्ठ गायक पं. दिनकर कैकिणी यांना तानसेन पुरस्कार, तर मेंडोलिन वादक यू. श्रीनिवास यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर.
👉 २००६ : माँत्रियालच्या डॉसन कॉलेजमध्ये किमवीर गिलने एक विद्यार्थ्याला मारले, १९ जखमी केले व नंतर आत्महत्या केली.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9880214288,9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍*जन्म🌍
👉१५३३ : एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची, इंग्लंडची राणी.
👉१८५२ : गणेश जनार्दन आगाशे, नामांकित शिक्षक, संस्कृत पंडित, व्युत्पन्न ग्रंथकार व उत्तम वक्ते, इंदूर येथे भरलेल्या १०व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
👉१९३२: डॉक्टर प्रभा अत्रे शास्त्रीय गायिका, किराणा घराण्याच्या गायिका आणि रचनाकार , "गानप्रभा".
🌍*मृत्यू *🌍
👉२०२२: एन. एम जोसेफ भारतीय राजकारणी, केरळचे आमदार.
👉२०२०: अजित दास - भारतीय चित्रपट अभिनेते.
👉२०१२: रंगनाथ मिश्रा भारताचे एकविसावे सरन्यायाधीश.
👉१९७१: केशव त्र्यंबक दाते - चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते.
▬▬▬#######▬▬▬
*सुविचार:त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे.नव्हे, नव्हे त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या.* ▬▬▬########▬▬▬ *आजची बोधकथा* #################
*शहाण्याचा सल्ला*
#######$$$$$$$$$$
*एकदा एका माणसाला त्यच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले. मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, "निश्चीतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करू शकेल. मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला. कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत.”*
*तात्पर्य :- यावरून आपण शिकलो कि सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#######▬▬▬ *१)भारतातील पहिले महिला तक्रार केंद्र कुठे सुरू करण्यात आले? २)भारतीय राज्यातील पहिल्या महिला मंत्री कोण? ३)किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?*
उत्तरे:1).भोपाळ
,२.विजय लक्ष्मी पंडित
,३.१९४८. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬▬#######▬▬
■ *कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा आदेश रद्द करा, अन्यथा आंदोलन : भरत रसाळे*
■ *जरांगे पाटलांकडून अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ*
■ *लातूर शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा.*
■ *'विविध खात्यांमधील हजारो सरकारी पदे भरण्यासाठी 9 खासगी कंपन्यांची निवड, खासगीकरणाच्या दिशेने राज्य सरकारचं पाऊल*
■ *एक महिन्याचा वेळ देतो, त्यानंतर एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरकू देणार नाही; मनोज जरांगे आक्रमक*
▬▬▬########▬▬▬
➖➖➖➖➖➖➖➖➖
मिलिंद विठ्ठलराव वानखेडे
मुख्याध्यापक
प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन
9860214288
➖➖➖➖➖➖➖➖➖
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा