*16 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *शनिवार* 🛟
*जागतिक ओझोन संवर्धन दिन*
मराठवाडा मुक्ती संग्राम
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1963 - झेराॅक्स 914 या प्रतिमुद्रक यंञाचे पहिले प्रात्यक्षिक*
👉 *2007 - इराकचा बगदाद शहरात ब्लॅकवाॅटर वर्ल्डवाईड या अमेरिकन भाडोञी सैनिकांनी 17 नागरिकांना निसुर चौकात ठार मारले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1942 - ना. धो. महानोर- निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी यांचा जन्म*
👉 *1984 - लुई रायर्ड- बिकीनिचे संस्थापक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2022 - के.डी. शोरे- भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक यांचे निधन*
👉 *2020 - पी.आर.कृष्णकुमार भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक एव्हीपी फाऊनडेशन चे संस्थापक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: ग्रंथ हीन घर म्हणजे देहहीन शरीर.*. 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬#########▬▬▬ *बोधकथा* . *हरणाची चतुराई*
▬▬▬#########▬▬▬
एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्या सहका-यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्या हरणाने आपल्या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्या बळी पडून फळे खाण्यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्याचे म्हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.
*तात्पर्य:आजच्या काळात कोणी जर आपल्याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्याचे ऐकायला हवे.*
▬▬▬######▬▬▬
▬▬▬######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#####▬▬▬ १)पहिली भारतीय महिला मिस युनिव्हर्स कोण? २)'2021 ला शाळा सुरू नव्हत्या ? कारण ३)भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत जाते ?
उत्तरे- १-सुश्मिता सेन,
२-कोरोनामूळे
३-गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल , मिझोरम ▬▬▬#######▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
■ *शासन निर्णयानुसार सहाय्यक अनुदाने व वेतनोत्तर अनुदान मंजुरीस मान्यता प्रदान*
*आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित*
■ *मराठवाड्यात उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषणांचा वर्षाव होणार?
■ *शिक्षकांना अशैक्षणिक कामांविरोधात कोल्हापुरात ३० तारखेला मोर्चा; आमदार आसगावकर यांची माहिती*
■ *देशाच्या विरोधात बोलणारी मंडळी खूप आहेत; नाना पाटेकरांनी नेत्यांना फटकारलं.*
■ *धीर सोडू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत, आता सरकारच्या मागे लागू; आदित्य ठाकरे औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर*
▬▬▬#####▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा