*18 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
*हरितालिका*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1999 - साहित्यीक व्यंकटेश माडगूळकर याना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जन्मस्थान पुरस्कार जाहीर*
👉 *2009 - रेडीओवर सलग 15 वर्ष आणि टेलिव्हिजन वर 72 वर्षै सुरु असलेल्या द गायडिग लाईट मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1945 - मॅक्फिचे संस्थापक जाॅन मॅक्फि यांचा जन्म*
👉 *1968 - भारतीय अभिनेते दिग्दर्शक व राजकारणी उपेंद्र राव याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1999 - मराठी चित्रपट दिग्दर्शक अरूण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन*
👉 *2004 - दलित साहित्यीक समीक्षक डॉ भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार: कलियुग कलीयुग म्हणू नका,कलियुगाला कलायुग बनवा.*. 🇳🇪 *🇨🇮. ▬▬▬######▬▬▬ *पद्माने फेडले कर्ज*
▬▬▬#######▬▬▬
पद्माचा जन्म सामान्य राजपूत घरात झाला होता, जेव्हा ती अडीच वर्षाची होती तेव्हा तिच्या आईवडीलांचा मृत्यू झाला होता. मात्र पद्माचा भाऊ जोरावरसिंह सोळा वर्षाचा होता. वडीलांना कमाविलेल्या धनातून पद्माचे पालनपोषण करत असे. त्याने पद्माला घोड्यावर बसणे, तलवार चालविणे, बाण चालविणे याचे प्रशिक्षण दिले होते. पद्मा नेहमीच सैनिकांचे कपडे घालत असे. जोरावरसिंह याच्याजवळील वडीलांनी मिळविलेले धन संपले तेव्हा त्याने काम शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला काम मिळाले नाही. खर्च चालविण्यासाठी त्याने सावकाराकडून पैसे उसने घेतले व वायदा केला की काम मिळताच पैसे परत करीन पण त्याला काम मिळत नाही हे पाहून सावकाराने जोरावरसिंहाला कैद केले. अशा परिस्थितीत पद्मा एकटी पडली. पण तिने न डगमगता धाडसाने राजपूत सैनिकीरूपात आपले युद्धकौशल्य ग्वाल्हेरच्या तत्कालिन महाराजांसमोर प्रदर्शित केले. प्रभावित होऊन राजांनी तिला सैनिकाची नोकरी दिली. पद्माने युद्धात इतकी वीरता सिद्ध केली की तिला हवालदार हे पद मिळाले ती आपल्या वेतनातून सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी थोडे थोडे पैसे जमा करू लागली. परंतु एके दिवशी सेनापतीने तिचे हे रहस्य जाणून घेतले आणि महाराजांना सांगितले. महाराजांनी कारण विचारल्यानंतर तिने आपली कथा सांगितली हे ऐकून महाराजांनी जोरावरसिंह याची सावकाराच्या कैदेतून सुटका केली व त्याला आपल्या सैन्यात भरती केले व पद्माचा विवाह सैन्यातील एका वरिष्ठ अधिका-याशी करून दिला.
- *तात्पर्य: विपरीत परिस्थितीत सुद्धा आपल्याला पुर्ण ताकदीने संघर्ष करता आला पाहिजे.*
▬▬▬######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬######▬▬▬ *१)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात खाजगी सर्वाधिक साखर कारखाने आहेत? २) पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? ३)नेफा हे •••••••••जुने नाव आहे .
उत्तरे: १-कोल्हापूर, २-अनैमुडी-२६९५मी
३-अरुणाचल प्रदेश ▬▬▬#######▬▬▬ ठळक घडामोडी*
▬▬▬#######▬▬▬
👉 *राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.*
👉 *'एक मराठा, लाख मराठा'ने सांगली दुमदुमली; मराठा क्रांती मोर्चाचा लाखोंच्या उपस्थितीत अतिविराट मोर्चा*
👉 *पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारकडून 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा*
👉 *नव्या संसदेच्या वास्तूवर फडकवला तिरंगा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत सोहळा*
👉 *अखेर 24 वर्षांनंतर टीम इंडियानं घेतला बदला! भारतानं श्रीलंकेला अवघ्या 50 धावांवर गुंडाळलं.*
▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा