*20 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟
*ऋषी पंचमी*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1857 - भारतीय क्रांतिकारकानी पुकारलेल्या स्वातंत्र्य उठावाचा वेळी ताब्यात घेतलेली दिल्ली येथील सत्ता इंग्रजाचा इस्ट इंडीया कंपनीने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली*
👉 *1930 - महाराष्ट्रीयन मराठी नाटककार वीर वामनराव जोशी याच्या राक्षसी महत्तवकांक्षा या नाटकातील पहिला प्रयोग मुंबई येथे सादर करण्यात आला*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1948 - भारतीय दिग्दर्शक व चित्रपट निर्माते, पटकथालेखक महेश भट्ट यांचा जन्म*
👉 *1922 - महाराष्ट्रीयन साहित्याचे गाढे अभ्यासक व संशोधनकार द.ग.गोखले याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1942 - भारत छोडो आंदोलनाचा वेळी राष्ट्रध्वज घेऊन निघालेल्या मिरवणुकीचे नेतृत्व करित असताना केलेल्या गोळीबारात भारतीय क्रांतिकारक महिला कनकलता बरूवा यांचे निधन*
👉 *2012 - भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि रंगमंच दूरदर्शन हिन्दी चित्रपट अभिनेते दिनेश ठाकुर यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*सुविचार:शब्द जपून वापरावे,शब्दांची धार तलवारी पेक्षा तीक्ष्ण असते. ▬▬▬########▬▬▬ 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬########▬▬▬ *स्वामी रामातीर्थ व जपानी विद्यार्थी*
▬▬▬#######▬▬▬
स्वामी रामतीर्थ अमेरिकेला चालले होते तेव्हाची गोष्ट. ते ज्या जहाजात बसले होते त्यातून सुमारे दीडशे जपानी विद्यार्थी अमेरिकेला चालले होते. स्वामीजींचा त्यांच्याशी परिचय झाला. आणि ते विद्यार्थी स्वामीजींच्या ज्ञानाने फारच प्रभवित झाले त्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण श्रीमंत कुटुंबातील होते. स्वामीजींनी त्यांना बोलता बोलता विचारले, ‘ तुम्ही सर्व अमेरिकेला शिक्षणासाठी जात आहात का’ सर्वांनी स्वामीजींना विशेष अध्ययनासाठी जात असल्याचे सांगितले तेव्हा स्वामीजींनी त्या सर्वांना सहज प्रश्न केला, ‘ बरं, हे सांगा, बरेच दिवस तुम्ही अमेरिकेत राहणार आहात, तर त्यासाठी पैशाची व्यवस्था आपल्याकडे काय आहे’ स्वामीजींच्या त्या प्रश्नाचे उत्तर त्या विद्यार्थ्यानी दिले, ‘ स्वामीजी आम्ही तर या जहाजाचे भाडेही सोबत आणलेले नाही. जहाजात काही काम करून त्याचे भाडे देऊ आणि अमेरिकेतही आपल्या शिक्षणाचा खर्च एखादी नोकरी करून भागवू. आपल्या राष्ट्राचे धन व्यर्थ विदेशात का खर्च करावे, स्वामी रामतीर्थांनी पाहीले की सर्व विद्यार्थी जहाजात सफाई आणि छोटे मोठे काम करून जहाजाचे भाडे जमा करीत होते त्यांचे देशप्रेम पाहून स्वामीजी फारच प्रसन्न झाले आणि मनात विचार करू लागले की, विदेशात शिक्षण घेणारया भारतीय विद्यार्थ्यानीही असा विचार केल्यास भारताला संपन्न राष्ट्र बनायला वेळ लागणार नाही
*तात्पर्य :देशासाठी साधनांचा ,धनांचा सदुपयोग अशी राष्ट्रसेवा आहे की,ज्यामुळे राष्ट्र जलदगतीने प्रगतीचा दिशेने वाटचाल करू शकते. ▬▬▬########▬▬▬
*ऋषी पंचमी*
*भारतात जुन्या विद्वान ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी, निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणून ऋषीपंचमी हा सण साजरा करतात.*
*सप्तर्षी, अरूंधती व गणपती यांची या दिवशी पूजा करतात. सप्तर्षींच्या सात, अरूंधतीची एक व गणपतीची एक अशा नऊ सुपा-या मांडून पूजा करतात. बायका या दिवशी बैलाच्या मेहनतीचे काहीही खात नाहीत. तसेच गाईचे दूध पीत नाहीत. असे करणे जेव्हा शक्य नसेल तेव्हा फक्त उपवास करतात. खेडेगावातील बायकांना हा उपवास शास्त्रोक्त पध्दतीने करता येतो कारण घराच्या मागील भागात भाजीपाला, वेल इत्यादी लावलेले असतात. त्यांचा ह्या दिवशी उपयोग होतो. या दिवशी पाच प्रकारच्या किंवा एकवीस प्रकारच्या भाज्या एकत्र करून त्या जेवणाच्या वेळी गणपतीला नैवेद्य दाखवून मग जेवण
▬▬▬#########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬#########▬▬▬ १)प्रोग्राम आणि डाटा तात्पुरता साठविण्यासाठी ••••••••चा वापर केला जातो. २)घटनात्मक बाब तपासण्यासाठी किमान किती न्यायाधीशांची घटनापीठ स्थापन करण्याची तरतूद आहे ?
३)2011च्या जंगणनेनुसार कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दार उणे होता?
उत्तरे :१- RAM.
२-पाच ,
३- नागालँड. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
👉 *जुन्या संसद भवनाला 'संविधान सदन' म्हणून ओळखलं जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची सूचना*
👉 *एलआयसी एजंट्सला बाप्पा पावला! ग्रॅज्युटी, फॅमिली पेन्शनबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा 13 लाख लोकांना होणार फायदा*
👉 *कॅनडाच्या वक्तव्यावर भारत संतप्त, कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी, 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश*
👉 *कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले, आता पुढे काय?*
👉 *काय सांगता! चक्क साबणावर गणपतीची प्रतिमा, नांदेडच्या शिक्षकाच्या छंदाची अशीही कहाणी...*
👉 *विराट-रोहितला आराम, राहुलकडे नेतृत्व, अश्विनचं कमबॅक; ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिकेसाठी शिलेदारांची घोषणा*
▬▬▬▬######▬▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा