*21 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *गुरुवार* 🛟
*आंतरराष्ट्रीय शांतता दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2003 - गॅलिलिओ या अंतराळयाने मुद्दामहून गुरु चा वातावरणात प्रवेश केला अत्यंत दाबामुळे यान नाश पावले*
👉 *1968 - रिसर्च ॲड ॲनॅलॅसिस विग (RAW) या गुप्तचर संघटनेची स्थापना झाली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1939 - भारतीय तत्वज्ञानी आणि राजकारणी अग्नीवेश यांचा जन्म*
👉 *1944 - चित्रपट निर्माते कवी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1982 - महाराष्ट्रीयन मराठी कवी कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन*
👉 *2012 - भारतीय पञकार व हिन्दु वृत्तपञाचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सुविचार *_
┅━═########═━┅
*💡पैसे कमवत कमवत जगू नका, जगता जगता पैसे कमवा शेवटी खूप पैसे कमवाल पण जगणंच विसरून जाल ....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*म्हणी व अर्थ *_
*जशी नियत तशी बरकत.*
*🔍अर्थ:- ज्या प्रमाणे आपली वागणूक असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*🥇सामान्य ज्ञान 🥇*_
┅━═#########═━┅
*👉उर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे ?*
*🥇सूर्य*
*👉पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते ?*
*🥇लाला लजपतराय*
*👉महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे आहे ?*
*🥇सातारा*
*👉सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने असलेला जिल्हा कोणता ?*
*🥇अहमदनगर*
*👉वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते ?*
*🥇नायट्रोजन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_* बोधकथा *_
*परिस*
*एक माणूस परीस शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही,*
*तात्पर्य:-*
*प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने ..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा