*4 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *सोमवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2001 - हेवलेट पॅकर्ड या कंपनीने संगणक क्षेञातील काॅम्पॅक कार्पोरेशन ही बलाढ्य कंपनी 25 अब्ज डॉलर ला विकत घेतली*
👉 *19998 - स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सगैड ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगल ची स्थापना केली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1221 - श्री चक्रधर स्वामी-महानुभव पंथाचे संस्थापक यांचा जन्म*
👉 *1937 - शंकर सारडा- भारतीय साहित्य आणि समीक्षक याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2022 - रामचंद्र मोकेरी- भारतीय रंगमंच अभिनेते यांचे निधन*
👉 *2022 - सायरस पानोलजी मिस्ञी- भारतीय व्यापारी आणि उद्योजख यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सुविचार:जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंता सुद्धा!*. ▬▬▬#######▬▬▬ *राक्षसी प्रवृत्ती*
▬▬▬#######▬▬▬
एक राक्षस होता. त्याला आपल्या सर्व कामासाठी एका माणसाची गरज होती. त्याने शोधाशोध करून एका माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूप सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतेही काम तो पूर्ण करत असे. तो अविरत काम करत असे. मात्र राक्षस आपली वाईट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्याला सतत धमकावत असे. कामात त्याला विलंब झालेला चालत नसे. माणसाने जरा जरी कामात विलंब केला तरी मी तुला मारून टाकीन असे धमकी वजा राक्षस बोलत असे. माणूस राक्षसाच्या भीतीने घाबरून आणखी वेगाने काम करत असे. माणूस विचार करायचा की आपण जर काम नीट केले नाही तर आपल्याला हा राक्षस मारून तर टाकायचा नाही ना. एकेदिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की त्याला सुस्ती येऊ लागली. त्याला एक पाऊलही टाकवेना. थोड्या वेळाने राक्षस आला. माणसाला बसलेला पाहून राक्षस ओरडला,’’ तुझी अशी रिकामे बसून राहण्याची हिंमत झालीच कशी, चल उठ कामाला लाग नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ राक्षसाच्या धमकीने माणूस घाबरला. त्याच्या मनात विचार आला की तू माणूस आहे व तो राक्षस आहे. धमकाविणे हे त्याचे काम आहे. तू जोपर्यंत याला घाबरशील तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना याला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली. आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवे हा पुरुषार्थ त्याच्या मनात जागृत झाला व तो राक्षसाला म्हणाला,’’ सारखे सारखे खाऊन टाकण्याची भाषा कशाला करतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्हणजे मी पण एकदाचा सुटलो.’’ त्याची ही हिंमत पाहून राक्षसाने आपले वागणे बदलले. *तात्पर्य : रोजच्या जीवनात असे राक्षस आपल्याला घाबरवत असतात पण त्यांना किती किंमत द्यायची हे आपणच ठरवायचे असते.ज्यादिवशी आपल्यातील भीती सोडवून आपण पुढे चालू तेव्हा ही राक्षसीप्रवृत्ती आपोआपच गप्प बसते.*
▬▬▬#######▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ *१)ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? २) 'त्याने दगड मारला म्हणून आंबा खाली पडला' या वाक्यातील म्हणून हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे? ३)महानुभव पंथाचे संस्थापक कोण आहेत ? (उत्तरे: १-एडन, २-परिणाम दर्शक,३-श्री चक्रधर स्वामी) ▬▬▬#######$▬▬▬ ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *शिक्षक दिनी राज्यातील शिक्षक जाणार रजेवर.*
■ *शिक्षण संस्थांचे लेखा परीक्षण करणार.*
■ *लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांचे 96 लाखाचे धन जप्त, अपसंपदेचा गुन्हा दाखल*
*▪️संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या*
■ *वन नेशन, वन इलेक्शन कमिटीची अधिसूचना जारी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असणार समितीचे अध्यक्ष*
■ *मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय लाठीचार्ज होऊच शकत नाही"; आदित्य ठाकरेंचा घणाघात*
▬▬▬##########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा