*9 सप्टेंबर दिनविशेष 2023 !*
🛟 *शनिवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *1997 - 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रविण ठिपसेना बुध्दीबळातील ग्रॅडमास्टर किताब मिळविला*
👉 *2012 - भारतातील स्पेस एजन्सी चे यशस्वीरित्या 21 पीएसएलव्ही प्रक्षेपण केले*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1974 - कॅप्टन विक्रम बाञा- कारगिल युद्धातील शहिद झालेले अधिकारी यांचा जन्म*
👉 *1950 - श्रीधर फडके- संगीतकार याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2012 - व्हर्जिस कुरियन - भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमुल क्रांतीचे संस्थापक, पद्मभूषण, पद्मविभूषण यांचे निधन*
👉 *2012 - नार्मन जोसेफ व्हाउडलॅड- बार कोडचे सहसंस्थापक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सुविचार:शांतता बाहेर सापडणे फार कठीण आहे कारण ती आपल्या आतच दडलेले असावी. 🇳🇪 🇨🇮. ▬▬▬########▬▬▬ *राम आणि भरत*
▬▬▬######▬▬▬
रावणाचा वध करून राम अयोध्येला परत आले आणि त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा एक दिवस एका सभासदाने भरताला विचारले की आपण रामासाठी इतका मोठा त्याग केला आणि रामही आपल्याला प्राणप्रिय समजतात मग असे काय कारण आहे की आपल्याला सर्वात मागे स्थान देण्यात आले आहे? भरत म्हणाले,'' जे झाड कडू असेल त्याची सर्व पाने, फळे व फुले कडू असतात, माझ्या मातेने रामाला वनवासाला पाठवून पाप केले होते. तिचा पुत्र असल्यामुळे त्या पापाच्या कडवटपणातून मी कसा अलिप्त राहू शकतो? त्यामुळे मला मागचे स्थन देण्यात आले आहे.'' जेव्हा सभासदाने रामाला भरताचे हे विचार सांगितले तेव्हा रामचंद्र म्हणाले,''भरताचे हे विचार ठीक नाहीत, अयोध्येला परतल्यावर मी भरताला म्हटले होते की, उद्यापासून तू माझे छत्र घेऊन माझ्या मागे उभा राहा. कोणीही राजा तोपर्यत राजा राहू शकतो जोपर्यत त्याचे छत्र सुरक्षित आहे.'' सभासद आता विचारात पडला की कोणाचे विचार खरे मानावे? त्याने परत जाऊन भरताला रामाचे विचार ऐकवले. भरत म्हणाले,''रामचंद्र तर आपल्या लहानातल्या लहान सेवकाचीही प्रशंसा करत असतात. खरे तेच आहे जे मी तुम्हाला सांगितले.'' सभासद गोंधळला त्याने रामाला पुन्हा जाऊन भरताचे विचार सांगितले तेव्हा रामचंद्र म्हणाले,'' प्रेम आणि त्यागाच्या युद्धात मी भरताकडून हरलो, मी आपला पराभव स्वीकारून त्याला पाठ दाखविली, त्यामुळे तो पाठीमागे आहे. त्याचे मागे होणे हे त्याच्या महानतेचे लक्षण आहे.
▬▬▬########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬########▬▬▬ १)जादूगार रघुवीर यांचे नाव काय? २)'डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या कोणत्या शहरात करण्यात आली
३)पहिली भारतीय महिला केंद्रीय मंत्री कोण?
उत्तरे :१-रघुवीर भोपळे,
२-पुणे,
३-राजकुमारी अमृत कौर. ▬▬▬########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬########▬▬▬
■ *शिक्षण विभाग अधिक गतिमान, कार्यक्षम व पारदर्शक होण्यासाठी शिक्षकसेवा पंधरवडा 5 सप्टेंबर पासून राबवणे बाबत राज्य शासन निर्णय निर्गमित.*
■ *मुंबई महापालिका शाळांमध्ये रात्र अभ्यासिका सुरू; सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार*
■ *शाळेचे खाजगीकरण होणार प्रस्तावावर सही झाली.*
■ *मराठवाड्यातील 68% मराठी कुणबी?*
■ *एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ मुख्यमंत्र्याची घोषणा.*
■ *नाशिक मध्ये सकाळपासून पावसाची बॅटिंग गोदावरी परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती.*
■ *केलेला अभ्यास परीक्षेत आलाच नाही, मग बहाद्दराने उत्तर पत्रिकांवर चिटकवल्या 500 च्या नोटा; नांदेडच्या एसआरटी विद्यापीठातील प्रकार.*
• *आज अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्यास सलाईन काढणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, शिष्टमंडळ मुंबईला रवाना*
▬▬▬########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा