*पेन्शन शंखनाद आंदोलनासाठी टि शर्ट्सचे प्रमोशन*
*दिल्ली आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा*
*विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ नागपूर विभागाचा पुढाकार*
नागपूर - जुन्या पेन्शनच्या लढाई अंतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात शंखनाद फुंकण्यासाठी रविवार १ आॅक्टोंबर २०२३ रोजी रामलीला मैदान, दिल्ली येथे शंखनाद आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनासाठी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर विभागातर्फे टि शर्ट्सचे प्रमोशन करुन आंदोलनात व आंदोलनकर्त्यांमध्ये जोम भरला आहे.
पावन भूमी नागपूर येथे आज (ता ३) विदर्भ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे टि शर्ट्स प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबिसी महासंघाचे अध्यक्ष व संघटनेचे आधारवड श्री बबनराव तायवाडे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी उपस्थित होते.* प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते *शंखनाद आंदोलनासाठी टि शर्ट्सचे प्रमोशन करण्यात आले.* यावेळी मार्गदर्शन करताना श्री आशुतोष चौधरी यांनी जुन्या पेन्शनच्या लढाईत सर्वांनी एकत्र येऊन लढा द्यावा व दिल्ली येथील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी आगामी २०२४ हे निवडणुकीचे वर्षे असल्याने जुन्या पेन्शनच्या लढाईत गट तट विसरुन पूर्ण ताकतीनिशी प्रत्यक्ष सहभागी होऊन लढा द्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सचिव श्री खिमेश बढिये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शहर संघटक श्री समिर काळे यांनी तर आभार शहर संघटक श्री विवेक ढोबळे यांनी मानले. कार्यक्रमाला काॅगेस मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष श्री प्रकाश भोयर, माध्यमिक विभाग संघटक श्री शेषराव खार्डे, माध्यमिक विभाग शहर संघटक श्री राजू हारगुडे, काॅग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री संजय धरममाळी, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, शहर संघटक श्री समिर काळे, शहर संघटक श्री विवेक ढोबळे, महिला संघटिका डॉ प्रतिभा टापरे , समाज कल्याण (दिव्यांग) विभाग संघटक श्री दिनेश गेटमे, श्री युवराज चोरघडे, श्री गणेश आटोणे, श्री प्रमोद धोटे
यांच्यासह विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे संघटक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा