*03 ऑक्टोबर दिनविशेष 2023 !*
🛟 *मंगळवार* 🛟
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2009 - तुर्की कौन्सिल अझरबैजान, कझाकस्तान, किगीस्तान आणि तुर्की तुर्कीक काॅन्सिल मध्ये समाविष्ट झाले*
👉 *1670 - शिवाजी महाराजांनी दुसरांदा सुरत लुटली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1919 - नोबल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेम्स बुकॅनन यांचा जन्म*
👉 *1947 - सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *1959 - विनोदी लेखक विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम यांचे निधन*
👉 *1999 - सोनी कार्पोरेशन चे संस्थापक अकिओ मॅरीटो यांचे निधन*
👉 *2022-पांडुरंग राऊत-भारतीय राजकारणी गोव्याचे आमदार*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
सुविचार:घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत ठरत नाही. ▬▬▬########▬▬▬ 🇳🇪 🇨🇮.
▬▬▬#######▬▬▬
बोधकथा
*यशोविजय पंडित*
*_आजपासून तीन शतकांपूर्वी यशोविजय नावाचा एक विख्यात प्रकांड पंडित होऊन गेला. तो अनेक विषयांत निपुण होता. त्याच्या बाबतीत असे सांगण्यात येते की एकदा त्याला पंडीतांमार्फत एक विषय देण्यात आला होता. त्या विषयानुसार तो संस्कृतमध्ये बोलत राहिला. मात्र हळूहळू त्याला आपल्या पांडित्याचा गर्व होऊ लागला. व्याख्यानाच्यावेळी त्याच्या सांगण्यावरून त्याचे शिष्य चारही बाजूंनी झेंडे लावत असत. याचा अर्थ असा की, चारही दिशांमध्ये त्याचे नाव झाले आहे. विद्वत्ता आणि सफलता याचे प्रदर्शन अन्य शिष्यांना योग्य वाटत नव्हते. पण त्याला विचारण्याचे कोणीच धाडस करत नव्हते. एकेदिवशी एका शिष्याने त्याला मोठ्या हुशारीने विचारले, ''गुरुदेव, आपले पांडित्य धन्य आहे, मी मोठा भाग्यवान आहे की आपल्यासारख्या महापुरुषाचे दर्शन मला झाले, आपल्या सत्संगाचा लाभ झाला. एक प्रश्न मला बरेच दिवसापासून पडतो आहे पण धाडस करून हे विचारतो की, आपण जर इतके विद्वान आहात तर आपले गुरु व गुरुंचे गुरु किती मोठे विद्वान होते?'' पंडीत म्हणाले,''मी तर त्या दोघांपुढे काहीच नाही. त्यांच्या चरणाच्या धुळीइतकेसुद्धा मला ज्ञान नाही'' शिष्य म्हणाला,'' ते इतके विद्वान होते तर तेसुद्धा आपल्यासारखेच चारी बाजूंना झेंडे लावत असत का?'' पंडीताला आपली चूक समजली व त्याचे हृदय अहंकाररहित झाले._*
*_तात्पर्य:-ज्ञानाचे महत्व तेव्हाच असते जेव्हा ते ज्ञान अभिमानमुक्त असेल. अहंकाररहित ज्ञानच खरे मार्गदर्शक असते. अहंकाराने बाधित ज्ञान सर्वनाशाला कारणीभूत ठरते._
▬▬▬######▬▬▬
_ *प्रश्नमंजुषा*_ ▬▬▬#######▬▬▬ _१)महाराष्ट्रचे जंगलाबाबत विद्यालय कुठे आहे? _२)तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे?_ _३)भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम अप्रत्यक्ष पणे भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार बहाल करते?_
उत्तरे :१-अकोला.
_*२-बैतुल : मध्यप्रदेशांत सातपुडा पर्वतरागावर मूलताई येथे बैतुल टेकड्यांवर होतो*_
३) कलम १९. ▬▬▬########▬▬▬ _*ठळक घडामोडी*_
▬▬▬########▬▬▬
■ *दिल्ली: देशभरातील लाखो कर्मचारी दिल्लीत एकच मिशनची पेन्शन योजना.*
■ *जुनी पेंशन द्या, अन्यथा मते विसरा; दिल्लीत सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा.*
■ *कंत्राटी तहसीलदार नियुक्तीचे आदेश मागे.*
■ *सर्व जिल्ह्यातील गुरुजींचा आज आक्रोश मोर्चाला भरघोस प्रतिसाद*
▬▬▬#########▬▬▬
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा