*04 ऑक्टोबर दिनविशेष 2023 !*
🛟 *बुधवार* 🛟
*जागतिक अंतराळ सप्ताह*
*जागतिक प्राणी दिन*
🌍 *घडामोडी* 🌍
👉 *2021 - बब्बा वाॅलेस- NASCAR प्रमुख शर्यत जिक॔णारे पहिले आफ्रिकन अमेरिकन ड्रायव्हर बनले*
👉 *1985 - फ्री साॅफ्टवेअर ची स्थापना केली*
🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर*
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌍 *जन्म*🌍
👉 *1937 - जॅकी काॅलिन्स - इंग्लिश अभिनेता व लेखक यांचा जन्म*
👉 *1935 - अरूण सरनाईक -मराठी चित्रपट अभिनेता संगीतकार याचा जन्म*
🌍 *मृत्यू*🌍
👉 *2002 - भाई भगत- वृत्तपट निवेदक यांचे निधन*
👉 *2022 - शेखर जोशी - भारतीय लेखक यांचे निधन*
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहितो.*
०१) २०२१ चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' कोणाला प्राप्त झाला आहे ?
- आशा भोसले.
०२) जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी किती असते ?
- ५० सदस्य.
०३) परमहंस सभेची स्थापना कोणी केली ?
- दादोबा पांडूरंग तर्खडकर.
०४) 'उगवत्या सूर्याचे राज्य' असे कोणत्या राज्याला ओळखले जाते ?
- अरुणाचल प्रदेश.
०५) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
- गुरू.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*_सुविचार: सुखी होण्यासाठी सुखी होण्याच्या मार्ग म्हणजे निसर्गावर,नियतीवर ,प्रमेश्वरवरकोणावर तरी विश्वास ठेवावा.*_ 🇨🇮 🇨🇮 ▬▬▬########▬▬▬
_*मनाची एकाग्रता*_
▬▬▬########▬▬▬
*_एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे._''*
*_तात्पर्य : मनाची एकाग्रता साधल्याने बरेचशी कामे साध्य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्यास हमखास यश मिळतेच._*
▬▬▬##########▬▬▬
*प्रश्नमंजुषा* ▬▬▬##########▬▬▬ १) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कुठे चालवले? २)आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिकणारी पहिली भारतीय महिला मुष्ठीयोद्धा कोण ? ३) सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
(उत्तरे: १-मुंबई,
२-एम.सी.मेरिकोम,
३-गोपाळ गणेश आगरकर. ) ▬▬▬#########▬▬▬ *ठळक घडामोडी*
▬▬▬#########▬▬▬
■ *अजित पवारांचा अकॅडमी चालकांना इशारा, पालकांचे कान टोचले, नव्या शिक्षण धोरणाबद्दल मोठं वक्तव्य*
■ *प्रकाशावर महत्त्वाचे प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील सन्मान*
■ *वर्ल्ड कपपूर्वी भारताला मोठा धक्का; विराटने सोडली टीम इंडियाची साथ*
■ *नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे नई तालीम*
■ *पैसे मागणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी शिकवला धडा; हात बांधून थेट पोलीस ठाण्यात नेले* ▬▬▬########▬▬▬▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन*
*9860214288*
‐-------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा