खेळातुन सांघिक भावना निर्माण होईल


#खेळातून_सांघिक_भावना_निर्माण_होईल*

👉#अखिल भारतीय कोल समाजाचे अध्यक्ष छगन कठौते यांचे मनोगत



रामटेक - बालवयातच प्राथमिक स्तरावर क्रिडा स्पर्धाच्या आयोजनातून खेळाडू निर्माण करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून झाले. या सारख्या स्पर्धा सर्वत्र व्हाव्यात असे आवाहन उद्घाटक अखिल भारतीय कोल समाजाचे छगन कठौते यांनी केले.


प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कान्द्री-माईन येथे आयोजित शालेय स्तरीय क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चा मैदानावर आज (ता १७) अत्यंत उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कोल समाजाचे अध्यक्ष छगन कठौते ,गोंडवाना पार्टी चे तालुका अध्यक्ष गुड्डू उईके, समाजसेवक राष्ट्रपाल खोब्रागडे,श्री मडावी ,ग्राम पंचायत सदस्य कपिल देशमुख उपस्थित होते.


प्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर पाहुण्यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलित करून क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांन चा शारिरीक, मानसिक व बौध्दीक क्षमता वाढविण्या करिता क्रिडा उत्सव झालेच पाहिजे असे आव्हान मान्यवरांनी केले


कार्यक्रमाचे सुञसंचालन श्याम गासमवार व आभार प्रशांत सरपाता यांनी केला आयोजनासाठी अशोक नाटकर, विजय लांडे, सौ.कामिनी पाटील, सौ.सुचिता बिरोले, सौ.महानंदा इळपाते, कु.ज्योत्सना मेश्राम, ठकराले बाबु, प्रभाकर खंडाते, मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा