धर्मराज प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन
मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते गौरव
नागपूर जिल्ह्य़ातील पहिली खाजगी प्राथमिक शाळा
नागपूर - जिल्ह्य़ातील खाजगी प्राथमिक शाळेमधून धर्मराज प्राथमिक शाळा, कांद्री-कन्हानला ९००१-२०१५ आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्रांचे हस्तांतरण मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते पार पडले.
येथील सुरेश भट सभागृहात आज (ता ६) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांची सभा पार पडली. या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल, शिक्षणाधिकारी (प्राथ) रोहिणी कुंभार, शिक्षणाधिकारी (माध्य) श्री रविंद्र काटोलकर, पोलीस उपायुक्त (सायबर क्राईम) श्री अर्चित चांडक, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ गजेंद्र महल्ले, उपशिक्षणाधिकारी श्री सुशील बन्सोड व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी मांजा मुक्त पतंगोत्सव, शाळा व्यवस्थापन व गुणवत्तापूर्ण शिक्षण, सायबर क्राईम आदी बाबत उपस्थित मान्यवरांकडून मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी गुणवत्तापूर्ण शिक्षण, शालेय दप्तरांची योग्य मांडणी, विद्यार्थी पूरक सहशालेय उपक्रम, पालक सुसंवाद, विक्रमी ३० हजार दिव्यांचे रंगकाम, दप्तर मुक्त शाळा या सारख्या विविध बाबींसाठी धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हानला ९००१-२०१५ आयएसओ प्रमाणपत्र जारी करण्यात आले. *नागपूर जिल्ह्य़ातील आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारी धर्मराज प्राथमिक शाळा, कांद्री-कन्हान ही पहिली खाजगी प्राथमिक शाळा ठरली.*
या प्रमाणपत्राचे मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा व शिक्षणाधिकारी (प्राथ) रोहिणी कुंभार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांना आयएसओ प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी, पालक व कर्मचारी वर्गाने केलेल्या सांघिक कार्यामुळे हे यश मिळाल्याचे भावनोद्गार मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी व्यक्त केले.
धर्मराज प्राथमिक शाळेला मिळालेल्या या मानांकनाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री खुशालराव पाहुणे, पारशिवनी गटशिक्षणाधिकारी श्री कैलास लोखंडे, शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे, उपशिक्षणाधिकारी श्री भास्कर झोडे, वेतन पथक अधिक्षक श्री निलेश वाघमारे, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, मुख्याध्यापक सौ संध्या तिळगुळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री धनंजय कापसीकर आदिंनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा