*यशासाठी खडतर मार्ग स्विकारा - मुख्याध्यापक श्री वानखेडे*
मनसर - यश पदरात पडल्यावर आनंदाला पारावार उरत नाही. मात्र आनंद व यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी खडतर मार्ग स्विकारा असे आवाहन मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी केले.
प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथे आज (ता १६) दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सौ. शालिनी रामटेके, माॅयलचे कार्मिक अधिकारी श्री ललीत अरसडे, श्री प्रविण गजभिये, पत्रकार श्री आकाश वानखेडे, जिल्हा परिषद कान्द्रीचे मुख्याध्यापक श्री प्रशांत जांभूळकर, श्री महेश झाडे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याकरिता चिकाटी, जिद्द व मेहनत सातत्याने करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. कामिनी पाटील यांनी तर आभार श्री अशोक नाटकर यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विजय लांडे, सौ अनिता खंडाईत, सौ.सुचिता बिरोले, श्री प्रशांत सरपाते, कु.ज्योत्सना मेश्राम, श्री वसंता ठकराले, श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा