🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*संच मान्यता नवीन निकष शिक्षकांच्या जीवाला घोर- अतिरिक्त शिक्षक मिळविणे अवघड झाले*
दिनांक 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संच मान्यतेचे नवीन निकष अमलात आलेले आहे हे निकष सन 2024 पासून 24-25 या शैक्षणिक वर्षापासून अमलात येतील याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
1. संचमान्यतेची संदर्भ तारीख 30 सप्टेंबर असणार
2. द्विशिक्षकी शाळांमध्ये 60 पटासाठी किमान दोन शिक्षक असणार मात्र तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान 16 मुलांची अधिकची आवश्यकता असणार आणि हे तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान 76 मुलांचे आवश्यकता असणार.
3. 1 ते 20 च्या पटसंख्येच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असणार तथापि एक नियमित शिक्षक आणि *दुसरा सेवानिवृत्त शिक्षक* अशी दोन पदे असणार
4. पटसंख्या दहापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक शिक्षक मान्य होणार आणि *तोही सेवानिवृत्त शिक्षकांमधून नेमणार* सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध नसल्यास नियमित शिक्षक देणार
5. इयत्ता सहावी ते आठवी मध्ये एकच वर्ग असल्यास 35 पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे 53 पटानंतर नंतर दुसरा शिक्षक मान्य होणार. तिसरा शिक्षक मान्यवण्यासाठी किमान 88 पट लागणार.
6. . इयत्ता सहावी ते आठवी मध्ये दोन वर्ग असल्यास 70 पर्यंत दोन शिक्षक आणि त्यापुढे 88 पटानंतर नंतर तिसरा शिक्षक मान्य होणार. त्यानंतर शिक्षक मान्य करण्यासाठी प्रत्येकी 35 मागे 1 शिक्षक मिळणार.
7. इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन शिक्षक पात्र होण्यास किमान संख्येपेक्षा 18 विद्यार्थ्यांचा पट अधिक असावा लागणार.
8. मुख्याध्यापक पद पात्र होण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी /आठवी चा एकूण पट किमान 150 असावा लागणार मात्र जुन्या शाळेत पद संरक्षित करण्यासाठी 135 पट टिकवावा लागणार.
वरील निकष ही संच मान्यतेच्या शासन निर्णयामधील ठळक मुद्दे आहेत आणखी बऱ्याच अटी शर्थी त्यामध्ये आहे. तथापि वरील सर्व निकषांचा विचार केल्यास *सन 2024-25 पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण झटकेसरशी खाली येणार आहे* आणि ते प्रमाण टिकवणे देखील अवघड असणार आहे. तसेच नियमित एक शिक्षक शाळांचे प्रमाण वाढणार आहे.
मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या टिकणे हे एक यापुढे स्वप्नच असणार आहे, खरंतर आपल्या दृष्टीने ही एक धोक्याची घंटा आहे याबाबत जाणकारांनी आणि तज्ञ लोकांनी विचार करून यथा अवकाश का होईना पण योग्य मार्ग काढायला हवा.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
*शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय*
दिनांक :- 15 मार्च 2024
------------------------------------------
*डॉक्टर, इंजिनिअर प्रमाणे शिक्षकांच्या नावापुढे देखील इंग्रजी भाषेत " Tr " तर मराठीत " टी " असे संबोधन लिहिता येणार*
💧💧💧💧💧💧💧
*तसेच राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकांना ड्रेस कोड लागू*
--------------------------------------------
*राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत " Tr " तर मराठी भाषेत " टी " असे संबोधन लावता येईल असा महत्त्वपुर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने आज दिनांक 15 मार्च 2024 रोजी घेतला आहे. तसेच या संदर्भातील बोधचिन्ह मा. शिक्षण आयुक्त पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास प्रसिद्धी द्यावी. तसेच संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर देखील लावता येईल.*
शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु/ मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते. सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे शिक्षकीय पदाची वेशभूषा ही महत्वाची असते ही बाब विचारात घेता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्यांक इत्यादी सर्व व्यवस्थापना अंतर्गत अनुदानित/अंशतः अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसाहित तसेच अल्पसंख्यांक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या व सर्व बोर्डाच्या शाळेतील कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत शालेय शिक्षण विभागाद्वारे पुढील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
💧 सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव शिक्षकीय पदास अनुसरून असावा.
💧 सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार / चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा. तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राऊझर पॅन्ट, शर्ट इन करून परिधान केलेला असावा. गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम/ चित्रे असलेले पेहेराव परिधान करू नयेत तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्ट चा वापर शाळेमध्ये करू नये.
💧 परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी.
💧 उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकच ड्रेस कोड ठरविण्यात यावा.
पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेरावाचा रंग 💧कोणता असावा हे संबंध शाळेने निश्चित करावे.
💧 पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा रंग गडद असावा.
💧 महिला व पुरुष शिक्षकांनी पोषाखाला शोभतील अशी पादत्राणे ( उदा. पुरुषांनी शुज ) यांचा वापर करावा.
💧 स्काऊट गाईडच्या शिक्षकांना स्काऊट गाईडचे ड्रेस राहतील
💧 वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना/ महिलांना बूट वापरण्यातून सवलत देण्यात येईल.
-- शासन निर्णय हा केवळ शासन निर्णयांच्या संख्येत वाढ करणारा आहे. शिक्षकांना पेहराव कसा करावा हे समजते. वर्षांनुवर्षे शिक्षक पेहरावासंदर्भातल्या सूचनांचे पालन करत आलेले आहेत. कोणी काय घालावे? हा व्यक्तीचा मूलभूत स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. याबाबत शासनाने ढवळाढवळ करण्याची गरज नाही. तसेच केवळ नावापुढे Tr किंवा टी लावून शिक्षकांना सन्मान मिळणार नाही. त्यासाठी शासनाने शिक्षणसेवक आणि कंत्राटीकरण रद्द करून वेतन, पेन्शन, कॅशलेस आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
शिक्षण विभागाच्या सर्व कार्यालयात मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणूक देवून त्यांच्या प्रत्येक कामाला प्राधान्य द्यावे. सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेत पी एफ आणि पेन्शन सुरू करावी. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारे संच मान्यतेचे निकष बदलावे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*
संस्थापक अध्यक्ष
*विदर्भ प्राथमिक ,माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर*
9860214288, 9423640394
माजी मंडळ सदस्य
*महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभाग नागपूर*
___ *9860214288* ____
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा