पुन्हा एकदा मुलींची बाजी *प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* *आदिवासीबहुल भागातील यशाची परंपरा कायम* *काॅलेजचा निकाल 90.69%*


*प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


*मुलीची बाजी*


*आदिवासीबहुल भागातील यशाची परंपरा कायम*


*काॅलेजचा निकाल 90.69%*


मनसर - प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईनचा इयत्ता 12 वी चा निकाल 90.69% इतका लागला.
या वर्षी या काॅलेज मधून 43 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले असून त्यापैकी 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात साक्षी प्रविण खोब्रागडे (66%), तानिया सुरेश रौतेल (63.52%), अश्विनी ठाकरे (60%), हर्षीता कठौते, स्नेहा रोतेल ,तानिया रौतेल अव्वल आहेत. उर्वरित मुल प्रथम श्रेणी, व्दितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाली आहे. आज बुधवारी (दि 22) माॅयल येथील मुख्य प्रबंधक श्री जोशी, कर्मिक अधिकारी श्री ललीत अरसडे, चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ. संगीता धोटे, महात्मा फुले खैरी बिजेवाडाचे मुख्याध्यापक श्री धिरज यादव तसेच काॅलेजचे प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार मार्गदर्शनात मान्यवरांनी आदिवासीबहुल भागातील शाळेतील प्रगतीचे कौतुक केले. कला शाखेतील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असतात असे सांगीतले.
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी सुध्दा गुणवंत विद्यार्थ्यांन चे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा