*आदिवासीबहुल भागात यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ दखणे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक* *काॅलेजचा निकाल 90.69%*


*प्रकाश हायस्कूल ॲड ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


*आदिवासीबहुल भागात यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ दखणे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक*


*काॅलेजचा निकाल 90.69%*

मनसर - प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईनचा इयत्ता 12 वी चा निकाल 90.69% इतका लागला.
या वर्षी या काॅलेज मधून 43 विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ट झाले असून त्यापैकी 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात साक्षी प्रविण खोब्रागडे (66%), तानिया सुरेश रौतेल (63.52%), अश्विनी ठाकरे (60%), हर्षीता कठौते, स्नेहा रोतेल ,तानिया रौतेल अव्वल आहेत. उर्वरित मुल प्रथम श्रेणी, व्दितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाली आहे. *विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र दखणे साहेब व संस्थेच्या सचिव रेशमी दखणे मॅडम यांनी अभिनंदन व शुभेच्छा देत निकालावर समाधान व्यक्त केले.*
आज बुधवारी (दि 22) माॅयल येथील मुख्य प्रबंधक श्री जोशी, कर्मिक अधिकारी श्री ललीत अरसडे, चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ. संगीता धोटे, महात्मा फुले खैरी बिजेवाडाचे मुख्याध्यापक श्री धिरज यादव तसेच काॅलेजचे प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वर्ग 5 ते 8 चे विद्यार्थी रोहन लांजेवार, साक्षी रौताल, दिक्षा रौतेल, शालीनी कठौते, मनस्वी कठौते, सुजल कठौते, सौरभ उईके, सुजल कठौते, हर्षीता आकाश कठौते अशा 14 मुलांना माॅयल तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट बक्षीस देण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार मार्गदर्शनात मान्यवरांनी आदिवासीबहुल भागातील शाळेतील प्रगतीचे कौतुक केले. कला शाखेतील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असतात असे सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा