*E-Kuber प्रणाली शिक्षकवृंदातर्फे स्वागत...सॅलरी व डिडक्सन खात्यामध्ये शाळा प्रशासनाचा संभ्रम* *विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे लेखा उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना निवेदन* .


*E-Kuber प्रणाली शिक्षकवृंदातर्फे स्वागत...सॅलरी व डिडक्सन खात्यामध्ये शाळा प्रशासनाचा संभ्रम*


*विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे लेखा उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना निवेदन*


*शाळा प्रशासनाचा संभ्रम दूर करा - शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी*

नागपूर - वित्त विभागाच्या आदेशान्वये सुरु झालेल्या E-Kuber प्रणाली अंतर्गत शाळा प्रशासनाचा Salary व Deduction Account मध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. Deduction चा निधी Salary Account मध्येच थांबला असल्याने अद्याप शाळा प्रशासनाकडून देणी पूर्ण झाली नाही. हा निर्माण झालेला गोंधळ तत्काळ दूर करावा, अशी मागणी विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने लेखा उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ /माध्य) व वेतन पथक अधिक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वित्त विभागाच्या आदेशान्वये नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल 2024 चे वेतन E-KUBER प्रणाली अंतर्गत प्रथमच झाले आहे.
शासनाने स्विकारलेल्या E-KUBER प्रणालीमुळे कार्यालयीन नाहक वेळ वाचला असून कर्मचाऱ्यांना अतिविलंब वेतन देण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र या प्रणालीमुळे शाळांना व मुख्याध्यापकांना त्रास वाढला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. E-KUBER प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन शाळांच्या Salary Account मध्ये जमा झाले. मात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली Income tax, Society Loan, LIC व इतर कपात रक्कम ही शाळेच्या Deduction Account ला handover न होता शाळेच्या Salary Account ला जमा आहे.
त्यामुळे Income tax, Society Loan, LIC व इतर कपात या रकमेचा चेक देतांना शाळा प्रशासनाला त्रास होत आहे. यासाठी नव्याने Salary Account चे चेकबुक मागवावे लागणार आहे. या सोबतच शाळेचे आॅडीट लिहितांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात लेखा परीक्षण पुर्नतपासणीत मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण होण्याची भीती शाळा प्रशासन व मुख्याध्यापक वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
या विषयाच्या अनुषंगाने सोमवारी (ता १३) लेखा कोषागार विभागाच्या उपसंचालक मोनाली भोयर, माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सिध्देश्वर काळुसे यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन सादर करण्यात आले. यात E-KUBER प्रणालीत सुधारणा करून शाळांनी Deduction केलेला Amount हा पुढील महिन्यापासून Deduction Account ला जमा करण्यासाठी E-KUBER प्रणालीत सुधारणा करावी, किंवा
शाळा प्रशासनाला शालार्थ प्रणालीच्या नियमान्वये Deduction Account बंद करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावे
जेणेकरून शाळा प्रशासनामध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दुर होईल, अशी विनंती करण्यात आली. सदर विषयावर लेखा विभाग व शिक्षण विभाग एकत्र बसून सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देण्यात आले. या शिष्टमंडळात शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विभागीय सचिव श्री खिमेश बढिये, माध्यमिक संघटक श्री राजू हारगुडे, ग्रामीण जिल्हा संघटक श्री गणेश खोब्रागडे, टिईटी जिल्हा संघटक श्री भिमराव शिंदेमेश्राम, माध्यमिक संघटक श्री शेषराव खार्डे, पारशिवनी तालुका संघटक श्री नरेश तेलकापल्लीवार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा