HSSC Result 2024 राज्याचा बारावीचा 93.37 टक्के निकाल ; यंदाही मुलींनीच मारली बाजी


राज्याचा बारावीचा 93.37 टक्के निकाल ; यंदाही मुलींनीच मारली बाजी

HSC Result 2024 । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 93.37 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 2.12 टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुलीच अव्वल ठरल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर केला होता. यंदा त्या तुलनेत चार दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला आहे. यावेळी सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर उपस्थित होते. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 97.51 टक्के. सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा निकाल 91.95 टक्के आहे. मुलींनी मारली बाजी HSC Result 2024 । मुलींचा निकाल – 95.44 टक्के मुलांचा निकाल – 91.60 टक्के मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.84 टक्के ने अधिक आहे.
विभागनिहाय निकाल HSC Result 2024 । पुणे – 94.44 नागपुर -92.12 संभाजीनगर – 94.08 मुंबई – 91.95 कोल्हापूर -94.24 अमरावती -93 नाशिक -94.71 लातूर – 92.36 कोकण -97.51

कुठे पाहता येणार निकाल? HSC Result 2024
The post राज्याचा बारावीचा 93.37 टक्के निकाल ; यंदाही मुलींनीच मारली बाजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा