*लाईव्ह अर्थ संरक्षण सेवा ट्रस्टतर्फे शालेय साहित्याचे वितरण*
मनसर - येथील प्रकाश हायस्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन येथील विद्यार्थ्यांना लाईव्ह अर्थ संरक्षण सेवा ट्रस्ट नागपूर तर्फे द्वारे आज (ता ८) मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले.
शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाईव्ह अर्थ सेवा संरक्षण ट्रस्टचे संचालक व मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मॉइल कार्मीक अधिकारी श्री अमित कुमार सिंह उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक श्री मिलिंद वानखेडे यांनी शाळेचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांना समाजाचे कसे सहकार्य लाभते यासंदर्भात मार्गदर्शन केले. लाईव्ह अर्थ संरक्षण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ऐ. टी खोब्रागडे यांनी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात विद्यार्थ्यांकरिता शालेय सामुग्री वितरण उपक्रम व वृक्षारोपण राबवण्याचा धाडस या ट्रस्ट चा माध्यमातून केला आहे. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ कामिनी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री अशोक नाटकर, श्री विजय लांडे, श्री प्रदीप सरपाते, कु ज्योत्सना मेश्राम, अनिता खंडाईत, श्री ठकराले बाबु, श्री मिलिंद वाघमारे यांनी सहकार्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा