#schoolchalehum धर्मराज शैक्षणिक परिसरात शालेय प्रवेशोत्सव साजरा


*धर्मराज शैक्षणिक परिसरात शालेय प्रवेशोत्सव साजरा*
*धर्मराज प्राथमिक शाळा कन्हान*
*#schoolchalehum*
*१ जुलै शाळेचा पहिला दिवस साजरा*
*विद्यार्थ्यांचे 'स्कुल चले हम'*


कन्हान :- विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी *धर्मराज शैक्षणिक संस्थेत* आज (ता १ जुलै) प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.



*प्रवेशोत्सव व शिक्षणोत्सव २०२४* आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय कापसीकर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून परिवहन समितीचे अध्यक्ष व पालक प्रतिनिधी श्री गज्जू बल्लारे, धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, प्राथमिक विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ चित्रलेखा धानफोले, माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री नरेंद्र कडवे, बालकमंदिर च्या शिक्षिका सौ कविता साखरकर उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माॅ सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

तद्नंतर पाहुण्यांच्या हस्ते व उपस्थित सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्प वर्षाव करुन बिस्कीट पुड्याचे वाटप करुन टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाहुण्यांच्या हस्ते मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले. *सहज मनाच्या संस्कारांना उत्तम आहे शाळा.... म्हणूनच अ, आ, इ शिकण्यास.... नियमित जा बाळा* या विषयावर मार्गदर्शन करुन सर्व विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत येण्याचे आवाहन मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्री दिनेश ढगे यांनी केले. 
आज *प्रवेशोत्सव व शिक्षणोत्सव* कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प वर्षावाने मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, वर्गशिक्षिका कु शारदा समरीत, सौ चित्रलेखा धानफोले, सौ वैशाली कोहळे यांनी स्वागत केले. तद्नंतर *माझे शिक्षणाचे पहिले पाऊल* या थिमअंतर्गत पहिलीत सर्व विद्यार्थ्यांचे *कोवळ्या हाताचे छापे कागदावर घेऊन तो महत्त्वाचा कागद सर्व विद्यार्थ्यांनी संग्रही ठेवावा यासाठी पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.* 


कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री किशोर जिभकाटे, श्री अमीत मेंघरे, श्री गणेश खोब्रागडे, श्री राजू भस्मे, श्री सतीश राऊत, श्री तेजराम गवळी, श्री प्रशांत घरत, कु हर्षकला चौधरी, कु प्रिती सुरजबंसी, कु पूजा धांडे, कु अर्पणा बावनकुळे, कु शारदा समरीत, सौ वैशाली कोहळे, सौ माला जिभकाटे, सौ कोकीळा सेलोकर, सौ छाया कुरुटकर, सौ सरीता बावनकुळे, सौ सुनीता मनगटे, सौ सुलोचना झाडे, सौ नंदा मुद्देवार, सौ परी अनकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा